येरवड्यातील म्हाडा वसाहती विकसित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:53 AM2017-08-03T02:53:01+5:302017-08-03T02:53:01+5:30
येरवडा येथील म्हाडा वसाहतीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत आमदार जगदीश मुळीक यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता
चंदननगर : येरवडा येथील म्हाडा वसाहतीतील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत आमदार जगदीश मुळीक यांनी केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथील त्यांच्या दालनामध्ये म्हाडाचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती.
आमदार जगदीश मुळीक यांनी वाढीव ४ एफएसआय मिळावा, अशी मागणी केली व वसाहतीतील मोडकळीस आलेल्या इमारती व नागरिकांना भेडसावणारे मूलभूत विविध प्रश्न व समस्या मांडल्या; तसेच म्हाडाच्या वसाहती जुन्या असून, त्यांचा लवकरच पुनर्विकास करण्याचा निर्णय घ्यावा व यामध्ये सोसायटी बनविण्यासाठी काही नियम शिथिल करून बाधित कुटुंबाला योग्य मोबदला देण्यात यावा. आमदार मुळीक यांनी मंत्री महोदयांशी चर्चा केली.
मंत्री महोदयांनी स्थानिक कार्यकर्ते व नगरसेवक यांनी मांडलेल्या सूचना व समस्या समजून घेऊन पुणे क्षेत्रीय अधिकारी यांना याबाबत समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी आदेश देण्यात आले.
याप्रसंगी म्हाडा पुणे मंडळाचे उपकार्यकारी अधिकारी, अजय सावंत, ज्ञानेश्वर बाबर, अर्चना कुचेकर, नामदेव घाडगे, राजूशेठ बाफना, राजकुमार खोपकर, दिलीप म्हस्के, रामचंद्र देशमुख, बाबलू वैष्णव, नितीन कुचेकर, सुनील गायकवाड, नीलेश जठार, नितीन गुंजाळ, विलास भोसले, आत्माराम टेमकर, गजानन झागडे, संध्या शिंदे, निरंजन मराठे, शाहरुख शेख या बैठकीला उपस्थित होते.