MHADA: ‘म्हाडा’च्या लाॅटरीची ३० मे पर्यंत मुदत वाढली, १६ हजार अर्ज आले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 10:51 AM2024-04-10T10:51:45+5:302024-04-10T10:52:15+5:30

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविली आहे. या सोडतीत आता ४ हजार ८७७ घरांचा समावेश असेल....

MHADA: 'MHADA' lottery deadline extended till May 30, 16 thousand applications received | MHADA: ‘म्हाडा’च्या लाॅटरीची ३० मे पर्यंत मुदत वाढली, १६ हजार अर्ज आले

MHADA: ‘म्हाडा’च्या लाॅटरीची ३० मे पर्यंत मुदत वाढली, १६ हजार अर्ज आले

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील घरांसाठी गेल्या महिन्यात सोडत जाहीर केली होती. मात्र, या योजनेला नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने या सोडतीला ३० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या १०० ने वाढविली आहे. या सोडतीत आता ४ हजार ८७७ घरांचा समावेश असेल.

म्हाडातर्फे गेल्या महिन्यात या सोडतीची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी ८ मार्चपासून या लॉटरीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. तर ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच होती. मात्र, या योजनेत केवळ १६ हजार अर्ज आल्याने म्हाडाला नाईलाजास्तव योजनेला मुदतवाढ द्यावी लागली आहे. आता ही मुदत ३० मे रोजी रात्री ११ वाजून ५९ पर्यंत असेल. नागरिकांना म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाने केले आहे.

अशी आहे सोडत

म्हाडा योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य : २४१६

म्हाडाच्या विविध योजना : १८

म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना : ५९

पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) : ९७८

२० टक्के योजना पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड : १४०६

एकूण ४ हजार ८७७ सदनिका

Web Title: MHADA: 'MHADA' lottery deadline extended till May 30, 16 thousand applications received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.