म्हाडा प्रथमच गुढीपाडव्याला काढणार तब्बल २ हजार घरांची लाॅटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:12 AM2021-04-02T04:12:12+5:302021-04-02T04:12:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला असताना पुणे हाऊसिंग मंडळाच्या वतीने ...

MHADA will draw lottery of 2,000 houses for the first time in Gudipadva | म्हाडा प्रथमच गुढीपाडव्याला काढणार तब्बल २ हजार घरांची लाॅटरी

म्हाडा प्रथमच गुढीपाडव्याला काढणार तब्बल २ हजार घरांची लाॅटरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला असताना पुणे हाऊसिंग मंडळाच्या वतीने ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तब्बल २ हजार घरांची सोडत काढणार आहे. म्हाडाच्या इतिहासात प्रथमच पाडव्याला एवढ्या मोठ्याप्रमाणात घरांची सोडत काढणार आहे. कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोना काळात जानेवारी २०२० मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल ५ हजार ६५७ घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या लाॅटरीला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला.

आता पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल २ हजार घरांची म्हाडा सोडत काढत आहे. यात म्हाडाच्या योजनेतील ६०० सदनिका व २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या १३०० असे एकूण १९०० सदनिकांच्या संगणकीय सोडत काढण्यात येणार आहेत. यात दीड हजार घरे ही पुणे शहरातील नामांकित बिल्डरांकडची घरे असून, ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नितीन माने-पाटील यांनी सांगातले.

Web Title: MHADA will draw lottery of 2,000 houses for the first time in Gudipadva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.