MHT CET Exam: एमएचटी सीईटी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात
By प्रशांत बिडवे | Updated: May 7, 2023 16:39 IST2023-05-07T16:39:34+5:302023-05-07T16:39:43+5:30
एमएचटी सीईटी २०२३ (पीसीबी ग्रुप) चे प्रवेश पत्र उमेदवारांना दिनांक १० मे, २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल

MHT CET Exam: एमएचटी सीईटी परीक्षेला मंगळवारपासून सुरूवात
पुणे : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी सीईटी २०२३ ही सामाईक प्रवेश परीक्षेची सुरूवात येत्या मंगळवारपासून हाेणार आहे. पीसीएम ग्रुप दि.९ ते १४ मे आणि पीसीबी ग्रुप १५ ते २० मे या कालावधीत प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
एमएचटी सीईटी २०२३ (पीसीएम ग्रुप) चे प्रवेश पत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. उमेदवारांनी प्रवेश पत्र अभ्यासक्रमाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावरुन डाउनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढावी. प्रवेश पत्रावरील परीक्षेचा दिनांक, परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. परीक्षेस जाताना प्रवेश पत्र सोबत घेवुन जावे. परीक्षेस जाताना उमेदवाराने त्याचबरोबर आपली ओळख दर्शविणारे ओळखपत्र जसे की, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट इत्यादी सोबत ठेवावीत. दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या अपंगत्वाबाबतचे मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. यासह एमएचटी सीईटी २०२३ (पीसीबी ग्रुप) चे प्रवेश पत्र उमेदवारांना दिनांक १० मे, २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल.