एमआयडीसी उभारणार तब्बल २ हजार एकरमध्ये लेक सिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:09 AM2021-01-14T04:09:05+5:302021-01-14T04:09:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मावळ तालुक्यातील तळेगाव टप्पा चार मध्ये महामंडळाच्या ...

MIDC to set up Lake City in 2,000 acres | एमआयडीसी उभारणार तब्बल २ हजार एकरमध्ये लेक सिटी

एमआयडीसी उभारणार तब्बल २ हजार एकरमध्ये लेक सिटी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मावळ तालुक्यातील तळेगाव टप्पा चार मध्ये महामंडळाच्या वतीने तब्बल २ हजार एकरपेक्षा अधिक जागेत आंध्र धरणाच्या बॅकवॉटरलगत आंतरराष्ट्रीय दर्जाची लेक सिटी उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर यासाठी निविदा मागविल्या आहेत. यामुळे एखाद्या एमआयडीसी क्षेत्रात औद्योगिक विकासासोबतच अशा प्रकारी लेक सिटीची निर्मिती हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे.

तळेगाव टप्पा चारमध्ये एमआयडीसीसाठी तब्बल ६ हजार एकरचे क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या टप्पा चारसाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. देशात बंगलोरनंतर महाराष्ट्रात प्रथमच तळेगाव टप्पा चारमध्ये हार्डवेअरची इंडस्ट्रीज उभी राहात आहे. तळेगाव टप्पा चारमधील ६ हजार एकरमध्ये पूर्णपणे प्रदूषण विरहित इंडस्ट्रीज उभारणार आहेत. यात सर्वाधिक भाग हा हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचा असणार आहे. या औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन कामाच्या ठिकाणीची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रहिवास सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने ही लेक सिटी उभारणार आहे.

आंध्र धरणालगतच्या निसर्गरम्य परिसरात तब्बल दोन हजार एकर पेक्षा अधिक जागेत ही लेक सिटी उभारणार आहे. यासाठी टप्प्या चार मधील निगडे, पवळेवाडी, आंबळे आणि कल्हाट या गावातील गावठाण सोडून शिल्लक जमिनीचे भूसंपादन करणार आहे. या लेक सिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या युनिव्हर्सिटीपासून गोल्फ क्लब, हाॅस्पिटलसपासून सर्व प्रकारच्या हायक्लास डेव्हलपमेंट करणार आहेत. यासाठी एमआयडीसीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे पुण्यात सहारा सिटी, लवासा सिटीनंतर आणखी एक लेक सिटी उभे राहणार आहे.

--

औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन लेक सिटीची निर्मिती एमआयडीसीच्या तळेगाव टप्पा चारमध्ये ६ हजार एकर मध्ये ६० व ४० प्रमाणात औद्योगिक क्षेत्र व रहिवास क्षेत्रचा विकास करणार आहे. यामुळेच तब्बल २ हजार एकरमध्ये ही लेक सिटी उभारणार आहे. यात सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार आहेत. यासाठी एमआयडीसीने आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदा मागविल्या आहेत.

- अविनाश हदगल, एमआयडीसी, प्रादेशिक अधिकारी

---

अशी असेल ही लेक सिटी

- एमआयडीसीचा राज्यातील पहिला प्रयोग

- सहा हजार एकरपैकी २ हजार एकर रहिवास क्षेत्रासाठी राखीव

- आंध्र धरणालगत अंत्यत निसर्गरम्य परिसरात लेक सिटी

- लेक सिटीत गोल्फ क्लब पासून आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी, हाॅस्पिटलस्

- लेक सिटीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील निविदा

- पुणे-मुंबई शहराला कनेक्ट असलेली सिटी

- प्रथम औद्योगिक क्षेत्राचा विकास नंतर लेक सिटीची डेव्हलपमेंट

- औद्योगिक क्षेत्रात शंभर टक्के नाॅन पोल्यूटेड कंपन्या

Web Title: MIDC to set up Lake City in 2,000 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.