चाकण नगरपरिषद हद्दीतील 130 हेक्टर जमिनीचे भूसंपादन वगळण्याची एमआयडीसीकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 07:17 PM2018-02-07T19:17:43+5:302018-02-07T19:18:05+5:30

एमआयडीसीने टप्पा क्रमांक 5 साठी भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली असून या टप्प्यातील चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील १३० हेक्टर जागा मूलभूत सोयी सुविधांसाठी भूसंपदानातून वगळण्याची मागणी नगरपरिषदेने एमआयडीसीकडे केली आहे. 

MIDC's order to exclude 130 hectares of land in Chakan municipal limits | चाकण नगरपरिषद हद्दीतील 130 हेक्टर जमिनीचे भूसंपादन वगळण्याची एमआयडीसीकडे मागणी

चाकण नगरपरिषद हद्दीतील 130 हेक्टर जमिनीचे भूसंपादन वगळण्याची एमआयडीसीकडे मागणी

googlenewsNext

चाकण : एमआयडीसीने टप्पा क्रमांक 5 साठी भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केली असून या टप्प्यातील चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील १३० हेक्टर जागा मूलभूत सोयी सुविधांसाठी भूसंपदानातून वगळण्याची मागणी नगरपरिषदेने एमआयडीसीकडे केली आहे.  चाकण शहराची औद्योगिकीकरणामुळे वेगाने वाढणारी लोकसंख्या व शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर येणारे व स्थायिक होणारे स्थलांतरित नागरिक यामुळे नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मोठी जबाबदारी नगरपरिषदेवर आहे. चाकणच्या आसपास औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने चाकण शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. 

त्यातच चाकण एमआयडीसीच्या टप्पा क्र. ५ करीता चाकण शहरातील सुमारे १३० हेक्टर जमीन भूसंपादन करण्याची कार्यवाही एम आय डी सी कडून सुरू झाल्यामुळे शहरातील सुविधा निर्मितीसाठी जागेची अडचण निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत चाकण शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीनीची आवश्यकता भासणार आहे. हीच बाब विचारात घेता एमआयडीसीने शहरातील जागा संपादनातून वगळावी, अशी मागणी नगर परिषदेने केली आहे. यासाठी नगरपरिषदेचे प्रयत्न सुरू असून, जमीन भूसंपदानातून वगळावी म्हणून बुधवारी (7 फेब्रुवारी) नगराध्यक्षा मंगलताई गोरे व उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी याबाबतचे निवेदन / प्रस्ताव एम आय डी सी चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांना दिले.
 

Web Title: MIDC's order to exclude 130 hectares of land in Chakan municipal limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे