शहरातील फेरीवाल्यांचे स्थलांतर

By admin | Published: March 4, 2016 12:50 AM2016-03-04T00:50:38+5:302016-03-04T00:50:38+5:30

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने शहरातील २८८ ठिकाणे निश्चित करून, त्याठिकाणी फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतुकीला अडथळा होणार नाही

Migrating hawkers in the city | शहरातील फेरीवाल्यांचे स्थलांतर

शहरातील फेरीवाल्यांचे स्थलांतर

Next

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने शहरातील २८८ ठिकाणे निश्चित करून, त्याठिकाणी फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा मोकळ्या जागा, कमी गर्दीचे रस्ते यासाठी निवडण्यात आले आहेत, अशी माहिती अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून अतिक्रमणविरोधात जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. बेकायदेशीर पथारी व्यावसायिक, हॉटेल, टेरेसचे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांकडून त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकांनी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली
आहे. त्याअंतर्गत शहरतील
पथारी व्यावसायिकांचे अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून,
त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले
आहे. या प्रमाणपत्रधारकांचे वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने स्थलांतर केले जाणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेने पुढाकार घेऊन शहरातील फेरीवाल्यांचा सर्व्हे केला. त्यामध्ये व्यवसायाचे स्वरूप, ठिकाण, क्षेत्रफळ निश्चित केले. संबंधित फेरीवाल्याचे छायाचित्र काढून घेऊन त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.
फेरीवाल्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागांवर त्यांचे स्थलांतर केले जाणार आहे.
पथारी व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन केले जावे, अशी मागणी पथारी व्यावसायिक संघटनेकडून केली जात आहे. फेरीवाल्यांना याअंतर्गत जागा निश्चित करून देण्यात आल्या तरी त्यांनी त्याठिकाणी कायमस्वरूपी दुकान मांडता येणार नाही. अन्नपदार्थ शिजविले जाऊ नयेत अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत.
> या सर्वेक्षणानुसार औंध ९१४, कोथरूड ६९३, घोले रोड १ हजार २११, वारजे कर्वेनगर १ हजार ६८, ढोले पाटील रोड १ हजार ४२५, नगर रोड ८२१, येरवडा ७९९, टिळक रोड १ हजार ३०१, भवानी पेठ ६०८, विश्रामबाग वाडा २ हजार ४०८, सहकारनगर ८८७, कोंढवा-वानवडी ९४८, धनकवडी ९०५, बिबवेवाडी ८१८ आणि हडपसर ८९७ आदी फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

Web Title: Migrating hawkers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.