इंदापूर येथील आश्रमातील बालकांचे पुण्याला स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:08+5:302021-09-07T04:13:08+5:30

इंदापूर : इंदापूर येथील माऊली बालक अनाथ आश्रमातील मुलांना मागील अनेक वर्षांपासून आपल्या सख्ख्या मुलांप्रमाणे सांभाळणाऱ्या युवा क्रांती प्रतिष्ठानच्या ...

Migration of children from Indapur Ashram to Pune | इंदापूर येथील आश्रमातील बालकांचे पुण्याला स्थलांतर

इंदापूर येथील आश्रमातील बालकांचे पुण्याला स्थलांतर

googlenewsNext

इंदापूर : इंदापूर येथील माऊली बालक अनाथ आश्रमातील मुलांना मागील अनेक वर्षांपासून आपल्या सख्ख्या मुलांप्रमाणे सांभाळणाऱ्या युवा क्रांती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी भरल्या डोळ्यांनी निरोप दिला असून, सर्व बालकांना पुणे वाघोली येथील मुख्य अनाथ आश्रमात स्थलांतर केले जाणार आहे.

यासाठी युवा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दशरथ भोंग, माजी नगरसेवक प्रशांत शिताप व भारतीय जैन संघटनेचे इंदापूर शहर अध्यक्ष धरमचंद लोढा, परिवार व युवा क्रांती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आश्रमातील सर्व बालकांसोबत शनिवारचा संपूर्ण दिवस सोबत राहून त्यांना सकाळचा नाश्ता, तसेच सायंकाळचे सात्विक भोजन देऊन आनंदाने दिवस पार पाडत गोपाळकाला बालगोपाळा सोबत साजरा केला.

यावेळी बोलताना प्रशांत शिताप अतिशय भावनिक होऊन म्हणाले की, मागील आठ वर्षे या अनाथ लेकरांनी आपल्याला खूप जीव लावला. दिवाळीमध्ये आपल्या मायमाऊली यांना अभ्यंगस्नान घालून औक्षण करत, फुलबाजे फटाके दिवाळी फराळ, रंग पंचमीला यांना रंग लावणे, रंगात रंगून जाने, कोजागिरीला मसाला दूध, पाडव्याला साखर घाट्या, ईदला शिरर्खुमा, कधी आळंदी, कधी पंढरपूर, यांची सहल घेऊन गेलो. यांचे दवाखाने शाळेतील अडचणी आरोग्य तपासणी, खूप जीव लागलाय या लेकरांचा. ही सर्व मुले शुक्रवार (दि. १० सप्टेंबर) रोजी इंदापूर शहरातून पुढील शिक्षणासाठी कायमची पुणे या शहरात जाणार आहेत. यांच्यासाठी नवीन शहर, नवीन माणसं, मात्र यांना येणारी प्रत्येक दिवाळी, राखी पाैर्णिमा व अनेक सण वार यांना इंदापूरची आठवण येत राहील. कारण तेवढे प्रेम व जीव या शहरातील नागरिकांनी या लेकरांना जीव लावला आहे. अनेक वेळा संकटाच्या काळात या मुलांना मोलाची मदत प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली होती.

बालक आश्रमातील मुलांना कधीही आई किंवा वडील नसल्याची उणीव या कार्यकर्त्यांनी भासू दिली नाही, असे सामजिक कार्यकर्ते प्रशांत शिताप (दादा) व धरमचंद लोढा (पापा) यांनी मुलांना कपडे, जेवण, शैक्षणिक साहित्य अनेक विविध स्वरूपाची मदत भरभरून दिली. खऱ्या अर्थाने कुटुंबातील सदस्य म्हणून ह्या मुलांशी कायम जवळीक ह्या सामजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी ठेवली. म्हणून या बालकांना निरोप समारंभ देत असताना यांना अश्रू अनावर झाले होते.

‘अनाथांचा नाथा’ पुरस्काराने केले सन्मानित

यामध्ये सागर भिसे, रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा, नितीन खिलारे, सचिन व्हावळ, रमेश टुले, पियुष बोरा, भारतीय जैन संघटनेचे धरमचंद लोढा, प्रशांत मामा उंबरे युवा मंच, प्रा. डॉ. जयश्री भास्कर गटकूळ, शमिर दाऊद शेख लकी परिवार, उद्योजक राजेंद्र जगताप, दुर्गा शिंदे, डॉ. अभिजित घाडगे, श्रीमती रोहिणी शिवलाल बोरा यांना ‘अनाथांचे नाथ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

फोटो ओळ : इंदापूर येथील माऊली बालक आश्रमातील मुलांसोबत शेवटचा फोटो घेताना युवा क्रांती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व पदाधिकारी.

Web Title: Migration of children from Indapur Ashram to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.