पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कर्नवडी ग्रामस्थांचे अखेर स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 06:23 PM2021-07-27T18:23:28+5:302021-07-27T18:32:40+5:30
३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले
मार्गासनी : पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्य कर्नवडी ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. येथील ३७ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले असल्याची माहीती तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी दिली. कर्नवडी ग्रामस्थ मोठ्या अनर्थापासून बचावले आहेत.
कर्नवडी गावाच्या डोंगराच्या बाजूला भेगा पडल्या आहेत. वेल्ह्याचे सरपंच, तहसिलदार आणि अधिकारी यांनी कर्नवडी गावास भेट दिली. परिसराची पाहणी केल्यावर ग्रामस्थांना स्थलांतर होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. परंतु येथील ग्रामस्थ गाव सोडून जाण्यास तयार होत नव्हते.
परंतु २६ जुलैला गावच्या वरच्या बाजूला असलेल्या सह्याद्रीच्या कड्यामध्ये रात्री १.३० सुमारास कड्याचा काही भाग कोसळून मोठा आवाज झाला. रात्रीच्या अंधारात येथील ग्रामस्थ घरच्या बाहेर पडले. यांची माहीती मिळताच वेल्हे प्रशासनाने प्रसंगावधान दाखवत त्याच दिवशी सह्याद्रीच्या कड्याकपारीत पायी चालत अधिकारी व कर्मचारी कर्नवडी येथे पोहचले. येथील लोकांना स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. महाड येथील रानवडी येथे स्थलांतर करण्यासाठी मध्येच रस्ता खचला असल्याने याठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने भराव करण्यात आला. येथील ३७ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले.