Milk Association Decision: राज्यात दूध ३ रुपयांनी महागले; शेतक-यांना फायदा अन् ग्राहकांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 08:24 PM2022-03-15T20:24:19+5:302022-03-15T20:24:26+5:30

दूधव्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची तर दूध विक्री दरामध्ये 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला

Milk goes up by Rs 3 in the state Farmers benefit and consumers suffer | Milk Association Decision: राज्यात दूध ३ रुपयांनी महागले; शेतक-यांना फायदा अन् ग्राहकांना भुर्दंड

Milk Association Decision: राज्यात दूध ३ रुपयांनी महागले; शेतक-यांना फायदा अन् ग्राहकांना भुर्दंड

Next

पुणे : दूध पावडर व बटरचे वाढलेले दर, वाढती मागणी व कमी उत्पादन, पशुखाद्य, इंधन दरवाढीमुळे शेतक-यांना दूध व्यवसाय करणे शेतक-यांना अडचणीचे ठरत आहे. यामुळेच दूधव्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची तर दूध विक्री दरामध्ये 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दूध दर वाढीमुळे शेतक-यांना 3 रुपयाचा फायदा तर ग्राहकांना 2 रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.
 
दूध पावडर व बटर यांचे वाढलेले दर त्यामुळे दूधाची वाढती मागणी व कमी उत्पादन यामुळे निर्माण झालेली स्पर्धा त्यामुळे दुधाच्या दरात वाढ झाली. तसेच पशुखाद्य, इंधन दरात झालेली वाढ यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील दुग्ध व्यवसाय करणे अडचणीचे झालेले आहे. या पार्श्वभूमीवर दूध खरेदी विक्रीच्या दराबाबत निर्णय घेण्यासाठी राज्यातील सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची कात्रज दूध संघ येथे बैठक घेण्यात आली. कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी  महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद, ऊर्जा, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फुर्ती, सोनाई, शिवप्रसाद, नेचर डिलाईट, रिअल डेअरी एस. आर. थोरात, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत चर्चा होऊन दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेणेत आला. दूध खरेदी दरात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने विक्री दरात देखील वाढ करण्याचा विचार झाला. तथापि ग्राहकांवरील दरवाढीचा बोजा कमी व्हावा या हेतुने विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयाने वाढ करुन विक्री कमिशन कमी करून तसेच खर्चात बचत करुन एक रुपयाचा बोजा डेअरी व्यावसायिकांनी सोसावा असा निर्णय एकमताने घेण्यात आला.

Web Title: Milk goes up by Rs 3 in the state Farmers benefit and consumers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.