दुधाचे दर घसरले, मात्र पशु खाद्याचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:48+5:302021-04-19T04:10:48+5:30

( सतिश सांगळे) कळस: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाची ओळख आहे. ग्रामीण भागात अनेक ...

Milk prices fell, but animal feed prices rose | दुधाचे दर घसरले, मात्र पशु खाद्याचे दर वाढले

दुधाचे दर घसरले, मात्र पशु खाद्याचे दर वाढले

Next

( सतिश सांगळे)

कळस: ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा व शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाची ओळख आहे. ग्रामीण भागात अनेक शेतकरी दूध व्यवसायात उतरले. त्यामध्ये सुबता आली. मात्र कोरोनाचा फटका दूध व्यवसायाला बसल्याने दुधाचे दर घसरले आहेत. पशुखाद्याचे दर वाढु लागले आहेत .त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

राज्यात ४५ लाख दूध उत्पादक आहेत. त्यांच्याकडून दररोज एक कोटी लिटर पेक्षा जास्त गाईच्या दुधाचं उत्पादन होते. मार्चअखेर ३० रूपयांवर असणारे दुधाचे दर कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने २५ रुपयांपर्यंत खाली कोसळले आहेत. वाढत्या प्रादूर्भावामुळे दूध प्रकल्प अडचणीत आले आहेत. आइसक्रीम, बेकरी आणि हाँटेल इंडस्ट्रीतून दूध पावडर, बटर आणि चीज यासारख्या मुख्य दुग्ध उत्पादनांची मागणी मंदावली आहे. पुढील काळात सदर प्रकल्प तसेच इतर खाद्यपदार्थ निर्मिती उद्योगाकडून मागणी ठप्प होण्याची चिन्हे आहेत. जानेवारीपासून काही प्रमाणात पावडर बटर विक्रीअभावी शिल्लक साठे पडून आहेत. पावडरची उत्पादन खर्च किंमत २६५/२७० रुपये प्रति किलो प्रमाणे आहे, हीच पावडर पुढे २००/२१० रुपये प्रमाणे विक्री होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

बाजारात मागणी नसल्याने अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे दूध संघानी खरेदीदर कमी केले आहेत. १ एप्रिल रोजी यामध्ये घट होऊन दर २८ रुपये करण्यात आले. नंतर ११ एप्रिल रोजी २६.५ रपयांपर्यंत खाली आले. १५ एप्रिल पासुन २५ रुपए शेतकरी दूध उत्पादकांना ३.५/८.५ च्या गुणवत्ते करिता दर देण्यात येत आहे. मात्र काही दिवसातच हे दर २३ रुपये होण्याची शक्यता

वर्तविण्यात येत आहे.

दुधाचे दर कमी झाले तरी पशुखाद्याचे दर कमी होण्याऐवजी वाढले आहेत सोयाबीन, शेंगदाणा पेंड, सरकी, मोहरी पेंड, बायपास फट, यांचे दर वाढल्यानेपशुखाद्यांचे दर गोणीमागे १०० ते २०० रुपयांनी वाढु लागले आहेत. एका बाजूला पशुखाद्याच्या, पशुवैद्यकीय औषधांच्या, चाºयाच्या आणि जनावरांच्या किमतीतली वाढ, दुसरीकडे उत्पादन खर्चापेक्षा किती तरी पटीने कमी असा दुधाला मिळणारा कवडीमोल दर, या दोन्हीत होरपळलेल्या दूध धंद्याचं दुखणं समाजावून घेतलं पाहिजे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आला आहे. दूध हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने दूध वाहतुकीला सुरूवातीपासूनच परवानगी आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना पूर्वीप्रमाणे दर द्यावेत अशी मागणी दूध उत्पादक शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Milk prices fell, but animal feed prices rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.