दूध उत्पादकाचा जीव टांगणीला : दूध खरेदी दर वाढीची बैठक लांबणीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 07:57 PM2019-04-04T19:57:43+5:302019-04-04T19:57:52+5:30

राज्य शासनाकडून मिळणारे दूध अनुदान मागील तीन महिन्यांपासून बंद आहे...

milk producer in tension due to late for meeting about milk rate increasing |  दूध उत्पादकाचा जीव टांगणीला : दूध खरेदी दर वाढीची बैठक लांबणीवर 

 दूध उत्पादकाचा जीव टांगणीला : दूध खरेदी दर वाढीची बैठक लांबणीवर 

Next

बारामती : वाढती दुष्काळाची दाहकता दूध व्यावसायाच्या मुळावर आली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते तसेच  दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणीही वाढते. त्यामुळे दुधाचे खरेदी दरही वाढतात. दूध खरेदीदराबाबत खासगी, सहकारी संस्था  व शासन प्रतिनिधींमध्ये होणारी बैठक काही कारणांमुळे लांबणीवर पडली. त्यामुळे दूध खरेदी दर वाढणार का? या चिंतेने दूध उत्पादकाचा जीव टांगणीला लागला आहे. 
राज्य शासनाकडून मिळणारे दूध अनुदान मागील तीन महिन्यांपासून बंद आहे. ३ एप्रिलला दुधदराबाबत खासगी व सहकारी संस्थांची व राज्य शासन प्रतिनिधींची बैठक होणार होती, अशी माहिती एका खासगी दूध संस्थेच्या संचालकाने दिली. या बैठकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे लागले होते. मात्र काही कारणांनी ही बैठक झाली नाही. सध्या निवडणुकांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्यायला राज्य शासनास वेळ नसल्याचेही कारण पुढे केले जात आहे.  
सध्या बारामती-इंदापूर तालुक्यातील दुग्ध व्यावसायिकांना गायीच्या ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या दुधाला २० रूपये दर मिळत आहे. सध्या उन्हाळ्याची दाहकता वाढली आहे. मागील वर्षी पावसाने ओढ दिल्याने बागायती भाग देखील चारा-पाण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. त्यात ओल्या चाऱ्यामध्ये येणाऱ्या मका व कडवळाचे (ज्वारी) दर गगणाला भिडले आहेत. दूध विक्रीपासून काहीच नफा होत नसल्याने चारा खरेदी करणार कोठून असाही प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. ओल्या मका १ हजार २०० रूपये प्रतिगुंठा दराने विक्री केला जात आहे. मागील वर्षी  जिरायती भागामध्ये पावसा अभावी ज्वारीच्या पेरण्या अत्यल्प झाल्या होत्या. तसेच काही पिके नंतर पाण्याअभावी जळून गेली. त्यामुळे यंदाच्या वर्षी कडबा पाहायला देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच ५० किलो पशूखाद्याची एक गोणी १ हजार २०० रूपयांना मिळत आबे.  सध्या दूधाला २० रूपये दर मिळत आहे. राज्य  शासनाने याआधी प्रतिलिटर ५ रूपये त्यानंतर ३ रूपये असे अनुदान शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली होती. मात्र मागील तीन महिन्यांपासून या अनुदानाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. शासनाकडून देण्याते येणारे ३ रूपये प्रतिलिटर अनुदान जरी दूध उत्पादकाला मिळाले तरी दूध व्यावसायातील तोटा भरून निघत नसल्याचे वास्तव आहे. चारा टंचाई, पडलेले दूधाचे दर, वाढता दुष्काळ, घटलेले दूध उत्पादन यामुळे परिसरातील जनावरांच्या बाजारात देखील मंदी निर्माण झाली आहे. जनावरांच्या किंमती ५० टक्क्यांनी घटल्या आहेत. त्यामुळे पशूपालक दुहेरी संकटात सापडला आहे. 

दिवसाकाठी सरासरी १८ लिटर दूध देणाºया एका विदेशी वंशाच्या गायीवर शेतकºयाला चारा, पशूखाद्य, औषधे, मजुरी व इतर खर्च धरता दिवसाला ३५० रूपये खर्च करावा लागतो. त्या गायीचे १८ लिटर दूधाची किंमत सध्याच्या दरानुसार फक्त ३६० रूपये इतकी होते. म्हणजे शेतकºयाच्या हातात एका गायीचे फक्त १० रूपये राहतात. दुष्काळी भागात तर शेतकºयाला फक्त शेणावरच भागवावे लागत असल्याचे वास्तव आहे. 

शासन प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन दूध धंद्याच्या सध्य स्थितीचा अभ्यास करावा. म्हणजे नेमकी परिस्थिती समोर येईल. दूध खरेदी दरामध्ये वाढ करताना ज्यावेळी चर्चा केली जाते. त्यावेळी दोन-चार दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील बोलवावे. फक्त खासगी व सहकारी संस्था चालकांच्या सल्ल्याने दूध खरेदी दर ठरवला जाऊ नये. 
- तुकाराम देवकाते

Web Title: milk producer in tension due to late for meeting about milk rate increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.