दुधाचा टँकर कालव्यात कोसळला

By Admin | Published: November 22, 2014 11:16 PM2014-11-22T23:16:48+5:302014-11-22T23:16:48+5:30

मोटार सायकल चालकाला वाचविण्याच्या प्रय}ात दुधाचा भरलेला टॅकर अवसरी खुर्द येथील डिंभा उजवा कालव्यात पलटी झाला. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

Milk tank collapsed in canal | दुधाचा टँकर कालव्यात कोसळला

दुधाचा टँकर कालव्यात कोसळला

googlenewsNext
अवसरी  :  मोटार सायकल चालकाला वाचविण्याच्या प्रय}ात दुधाचा भरलेला टॅकर अवसरी खुर्द येथील डिंभा उजवा कालव्यात पलटी झाला. मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र टॅकरचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. 
शिरूरकडुन दुधाने भरलेला टॅकर क्रमांक एम.एच.23, 5966 हा मंचरकडे येत असताना अवसरी खुर्द येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भोर यांच्या घराशेजारी ¨डभे उजव्या कालव्यात मोटारसायकल वाचविण्याच्या प्रय}ात टॅकर ¨डभा उजव्या कालव्यात गेला. टॅकरचा पुढचा भाग संपुर्ण पाण्यात गेला.मात्र टॅकरचालकाने उडी मारल्याने टॅकरचालक बचावला. मात्र टॅकरमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश भोर यांच्या घरानजीक मंचर-शिरूर रस्ता जात आहे. या रस्त्यावरून दिवसभरात भिमाशंकर साखर कारखान्याचे ऊसाचे व साखरेचे ट्रक, दुधाचे टॅकर, खाजगी वहाने, प्रवासी वाहतुक करणारी एस.टी.बस दिवसभरात एक हजार ते पंधराशे वाहनांची पहाटे 5 वाजल्यापासुन रात्री 1 वाजेर्पयत ये-जा चालु असते. ¨डभा उजवा कालवा शेजारी अत्यंत अंद रस्ता, जागेवरच उतार व साईडपट्टय़ा नसल्याने उजव्या कालव्याच्या पुलावर वर्षभरात तीन ते चार जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अवसरी फाटा ते कराळे पेट्रोलपंपावरील रस्त्याचे रूंदीकरण करावे. साईडपट्टय़ा वाढवाव्यात अशी मागणी  वाहनचालक करत आहे. 
¨डभे उजव्या कालव्यात पडलेल्या टॅकरमध्ये अंदाजे 12 हजार लिटर दुध होते. टॅकरने पुलाचा भक्कम कठडा तोडुन पुलाच्या पाण्यात गेला. मात्र टॅकरचे झाकण न निघाल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. (वार्ताहर)
 
4¨डभा उजवा कालवा शेजारी अत्यंत अंद रस्ता, जागेवरच उतार व साईडपट्टय़ा नसल्याने उजव्या कालव्याच्या पुलावर वर्षभरात तीन ते चार जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे रस्त्याचे रूंदीकरण करावे. साईडपट्टय़ा वाढवाव्यात अशी मागणी आहे.

 

Web Title: Milk tank collapsed in canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.