धडक मोहिमेत लाखांवर थकबाकीदारांची तोडली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:06+5:302021-09-24T04:11:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील २२ लाख ४६ हजार अकृषक वीजग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी २ हजार ५०३ कोटी ...

Millions of arrears were cut off during the strike | धडक मोहिमेत लाखांवर थकबाकीदारांची तोडली वीज

धडक मोहिमेत लाखांवर थकबाकीदारांची तोडली वीज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील २२ लाख ४६ हजार अकृषक वीजग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी २ हजार ५०३ कोटी १७ लाख रुपयांवर गेली आहे. त्यामुळे महावितरणने गेल्या पंधरवड्यात १ लाख ३ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

सद्य:स्थितीत पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा इतर अकृषक वर्गवारीतील २२ लाख ४५ हजार ९०० ग्राहकांकडे २५०३ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये (कंसात थकबाकी) पुणे - १० लाख ३६ हजार ६०० (१०४५ कोटी), सातारा - २ लाख २२ हजार ६०० (२६२ कोटी), सोलापूर - ३ लाख ३६ हजार ९०० (६६५ कोटी), सांगली - २ लाख ७६ हजार ९५० (२२६ कोटी) आणि कोल्हापूर - ३ लाख ७२ हजार ७६० ग्राहक (३०५ कोटी)

पुणे जिल्ह्यातील ६० हजार २६०, साताऱ्यात ४७९०, सोलापुरात ९६३१, कोल्हापुरात १९ हजार ५२८ आणि सांगली जिल्ह्यातल्या ९३१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान, महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २५) व रविवारी (दि. २६) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

Web Title: Millions of arrears were cut off during the strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.