शहरातील लाखो लिटर पाण्याच्या चोरीकडे होतेय सोयीस्कर दुर्लक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 12:09 PM2019-04-30T12:09:02+5:302019-04-30T12:17:58+5:30

शहराच्या विविध भागांसह उपनगरांमध्ये जोमात सुरु असलेल्या ‘आरओ प्लांट’ मधून बिनबोभाट पालिकेचे पाणी उचलले जात असून तेच पाणी फिल्टर करुन चढ्या भावाने सध्या विकले जात आहे.

Millions liters water theft in the city are easily neglected ? | शहरातील लाखो लिटर पाण्याच्या चोरीकडे होतेय सोयीस्कर दुर्लक्ष?

शहरातील लाखो लिटर पाण्याच्या चोरीकडे होतेय सोयीस्कर दुर्लक्ष?

Next
ठळक मुद्देपाणी पुरवठा विभाग : खासगी आरओ प्लांटमधून पालिकेच्या पाण्यावर डल्लाबेकायदा व्यवसाय करणाऱ्यांची साधी माहितीही या विभागाकडे नसल्याचे समोरगुगलवर अथवा जस्ट डायलवर अशा शेकडो व्यावसायिकांची यादी, पत्ता आणि संपर्क क्रमांक

पुणे : . पुण्यावर एकीकडे पाणीकपातीचे संकट घोंघावत असतानाच दुसरीकडे मात्र दररोज लाखो लिटर पाण्याची ‘चोरी’ होत असल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागांसह उपनगरांमध्ये जोमात सुरु असलेल्या ‘आरओ प्लांट’ मधून बिनबोभाट पालिकेचे पाणी उचलले जात असून तेच पाणी फिल्टर करुन चढ्या भावाने सध्या विकले जात आहे. वर्षाला कोट्यवधींचा ‘टर्नोव्हर’ असलेल्या या व्यवसायाकडे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे सोयीस्कररित्या दुर्लक्ष होत असून अशाप्रकारे बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांची साधी माहितीही या विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे. 
पाण्याच्या ब्रॅन्डच्या नावाखाली कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. बेकायदेशीरपणे महापालिकेचे पाणी वापरुन त्याचे बॉटलिंग करण्याचे प्रकार राजरोस सुरु असताना पालिकेला त्याचा पत्ता लागत नाही हे आश्चर्य आहे. पाणी पुरवठा विभागाने अनधिकृत नळ जोड घेणाऱ्यांविरुद्ध तसेच बेकायदा मोटार बसविणाऱ्यांविरुद्ध मोहिम हाती घेतली आहे. सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारा पाणी पुरवठा विभाग या आरओ प्लांट व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात मात्र बोटचेपी भूमिका घेत आहे. वास्तविक, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी काही महिन्यांपुर्वी पाणी पुरवठा विभागाला शहरातील बेकायदा पाणी व्यावसायिकांची यादी दिली होती. तसेच याठिकाणांवरचे  ‘स्टींग ऑपरेशन’ही करण्यात आलेले होते. मात्र, त्यावर ठोस कारवाई झाली नाही. 
अशा पाणी व्यावसायिकांबाबत अधिकाऱ्यांनाही नीटपणे काही सांगता येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. आम्ही या व्यावसायिकांचा शोध घेऊ शकत नाही. त्यांच्याबाबत ठोस माहिती मिळाल्यावर कारवाई करता येईल अशी मोघम उत्तरे अधिकारी देत आहेत. पाणी टंचाईच्या काळात अधिकारी पाणी चोरीच्या या प्रकाराबाबत गंभीर नसल्याचे किंबहुना सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. 
गुगलवर अथवा जस्ट डायलवर अशा शेकडो व्यावसायिकांची यादी पत्ता आणि संपर्क क्रमांकासह येते. पाषाण, डेक्कन, औंध, कात्रज, कोंढवा, हडपसर, वडगाव शेरी, विश्रांतवाडी, शिवणे, कोथरुड आदी भागांमध्ये अशा प्रकारचे प्लांट कार्यरत आहेत. सध्या लग्न सराई असल्याने फिल्टर पाण्याला मोठी मागणी आहे. अशा व्यावसायिकांचा शोध घ्यायचा असे ठरवलेच तर पालिकेला हे काम अवघड नाही. स्थानिक क्षेत्रिय कार्यालयांसह पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा हे काम करु शकते. मात्र, तसे होताना दिसत नाही. 
====
महापालिकेचे पाणी बेकायदेशीरपणे घेऊन लाखो लिटर पाणी फिल्टर करुन राजरोसपणे विकले जात आहे. एरवी टँकरच्या पाण्याच्या चोरीविषयी बोलले जाते, परंतू या प्लांटमधून मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी केली जात आहे. याबाबत स्टींग आॅपरेशन करुन पालिकेला पुरावे आणि 33 व्यावसायिकांची यादी दिली होती. मात्र, त्यावर काहीही कारवाई झाली नाही. पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांना सर्व माहिती असूनही कारवाई केली जात नाही. सर्वसामान्य पुणेकरांवर पाणी कपात लादणे, नळ जोड तोडणे अशा कामात आघाडीवर असलेले अधिकारी या बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. 
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर
====
पुणे शहराच्या हद्दीलगत परंतू ग्रामीण भागामध्येही अशा प्रकारचे आरओ प्लांट उभारण्यात आलेले आहेत. या आरओ प्लांटमध्ये पाणी कुठून आणले जाते, त्याच्यावर नेमकी काय प्रक्रिया केली जाते याविषयी पालिकेच्या अधिकाºयांना माहिती देता येत नाही. पालिकेचे अधिकारी अनभिज्ञ असलेल्या व्यावसायिकांपर्यंत दुकानदार, केटरिंग व्यावसायिक मात्र सहज पोचू शकतात अशी स्थिती आहे. सध्या 20 लिटरचा भरलेला जार 50 रुपयांना विकला जातो. तर मिनरल वॉटरचा दर वेगवेगळा आहे. 

Web Title: Millions liters water theft in the city are easily neglected ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.