शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

By admin | Published: May 15, 2017 06:43 AM2017-05-15T06:43:35+5:302017-05-15T06:43:35+5:30

शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने व जोरदार पावसामुळे कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ, उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांचे

Millions of rupees lost millions of farmers | शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव मूळ : शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याने व जोरदार पावसामुळे कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, कोरेगाव मूळ, उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर पुुणे-सोलापूर महामार्गावर वृक्ष उन्मळून पडणे, विजेचे खांब कोसळणे, घर, होर्डिंग्ज जमीनदोस्त झाले. बऱ्याच ठिकाणी शेतपिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पेठ (हवेली) येथील ज्ञानेश्वर शिवराम चौधरी यांच्या शेतातील पालक पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच नामदेव रघुनाथ चौधरी यांच्या शेतातील आंबे वादळी वाऱ्याने पडून मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची झाडे पडण्याबरोबरच दुकानांचे फलक उडून जाण्याचे प्रकार घडले. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब बऱ्याच ठिकाणी पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणची वीज शनिवारी रात्रीपासून गेलेली आहे. नायगावमध्ये झालेल्या वादळी पावसात तीन घरांचे पत्रे उचकटून नागरिकांचेनुकसान झाले आहे. तेथील भिल्लवस्तीमध्ये भिंती भुईसपाट झाल्या. दोन ठिकाणी पॉलिहाऊसचे छताचे कागद फाटून मोठे नुकसान झाले आहे. सिमेंट पाईप कंपनीचे गोडाऊन कोसळून त्यामध्ये असलेले सिमेंट पोत्यांचे नुकसान झाले. या सर्व झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी नागरिकांनी महसूल विभागास संपर्क केला आहे.

Web Title: Millions of rupees lost millions of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.