चलनातून बाद झालेल्या १ हजारांच्या नोटा बदलण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:46+5:302021-05-03T04:06:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या १ हजार रुपयांच्या नोटा दाखवून त्या ...

Millions swindled by the lure of exchanging 1,000 denomination notes | चलनातून बाद झालेल्या १ हजारांच्या नोटा बदलण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

चलनातून बाद झालेल्या १ हजारांच्या नोटा बदलण्याच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या १ हजार रुपयांच्या नोटा दाखवून त्या बदलून देतो, असे सांगून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पडदा फार्श केला आहे. लष्करातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

आण्णासाहेब अर्जुन धायतिडक (वय ३६, रा. रेंजहिल्स, शासकीय निवासस्थान, खडकी, मूळ गाव ता. बार्शी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून जुन्या बंद झालेल्या १ हजार रुपयांच्या ५६ खऱ्या नोटा, भारतीय मनोरंजन बँक, व ५०० रुपयांसारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा, मोटार असा एकूण २७ लाख ३५ हजार ५४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार तानाजी कांबळे यांना अण्णासाहेब धायतिडक हा जुन्या १ हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटा तसेच नकली नोटा घरी बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रेंजहिल्स येथील धायतिडक याच्या घरावर छापा घालून या बाद झालेल्या व बनावट नोटा ताब्यात घेतला.

त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांची ही एक टोळीच असल्याचे उघडकीस आले आहे. धायतिडक हा लष्करात कामाला असून तो दीर्घ रजेवर आल्यानंतर पुन्हा ड्युटीवर पुन्हा गेला नसल्याचे समजते. त्याचा साथीदार नवाब अली हा आपण चित्रपटसृष्टी काम करत असून शुटिंगसाठी अशा नोटा वापरत असल्याचे दाखवत असे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने धायतिडक याला अधिक तपासासाठी खडकी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस निरीक्षक पठाण अधिक तपास करीत आहेत़

असा रचत असत फसवणुकीचा कट

ही टोळी एखादे सावज हेरत. त्याला जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासंबंधीचे केंद्र सरकारचे एक बनावट सर्क्युलर दाखवत. आमच्याकडे १ हजार रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगून ते एक व्हिडिओ दाखवत. त्यात ते वर १ हजार रुपयांची जुनी बाद झालेली नोट लावून खाली बनावट नोटाचे बंडल असे. त्यानंतर त्यांना एखादा बँकवाल्याला शोधायला सांगत. बँकर आणि २ हजार रुपयांच्या खऱ्या नोटा आणल्यास मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे सांगत. त्यानंतर सर्व व्यवहार करुन देतो, आम्हाला त्याबदल्यात कमिशन द्यावे लागेल, असे सांगून त्यांच्याकडून कमिशनच्या नावाखाली लाखो रुपये लुटत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी पुण्यातील एकाला अशाच प्रकारे फसवून त्यांच्याकडून कमिशन पोटी तब्बल ४ लाख रुपये लुबाडले होते. साताऱ्यामध्येही त्यांनी एकाला अशाच प्रकारे लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Millions swindled by the lure of exchanging 1,000 denomination notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.