महापालिकेत एमआयएमचाही गट

By admin | Published: March 30, 2017 02:42 AM2017-03-30T02:42:13+5:302017-03-30T02:42:13+5:30

महापालिकेत आॅल इंडिया मजलीस-ए- इत्तेहादूल मुस्लीमिन (एमआयएम) या पक्षाची गटस्थापना करण्यात आली

The MIM group also participated in the municipal corporation | महापालिकेत एमआयएमचाही गट

महापालिकेत एमआयएमचाही गट

Next

पुणे : महापालिकेत आॅल इंडिया मजलीस-ए- इत्तेहादूल मुस्लीमिन (एमआयएम) या पक्षाची गटस्थापना करण्यात आली. एकमेव सदस्य निवडून आलेल्या या पक्षाने त्याच सदस्याचा गट व त्यांचीच गटनेतेपदी नोंदणी करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडली.
अश्विनी लांडगे या एकमेव सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. नियमाप्रमाणे त्यांनी विभागीय आयुक्तांकडे आपल्या पक्षाच्या नगरसेवकाची व गटनेतेपदाची नोंदणी केली. सदस्य म्हणून व नंतर गटनेते म्हणून त्यांची नियुक्ती करत असल्याबद्दलचे पक्ष संघटनेचे पदाधिकारी आमदार सय्यद जलील यांचे पत्रही विभागीय आयुक्तांना सादर केले.
ते दाखल करून घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयाने त्याबाबत महापालिका आयुक्तांना कळवले आहे. त्यात एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांची अधिकृतपणे नोंदणी झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The MIM group also participated in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.