पुण्यात एमआयएमने उघडले खाते

By admin | Published: February 25, 2017 02:19 AM2017-02-25T02:19:27+5:302017-02-25T02:19:27+5:30

पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच प्रवेश केलेल्या आॅल इंडिया मजिलिस-ए-इत्तेहदूल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षाच्या उमेदवारांनी लक्षणीय

MIM opened accounts in Pune | पुण्यात एमआयएमने उघडले खाते

पुण्यात एमआयएमने उघडले खाते

Next

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच प्रवेश केलेल्या आॅल इंडिया मजिलिस-ए-इत्तेहदूल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षाच्या उमेदवारांनी लक्षणीय मते मिळवत आपला प्रभाव निर्माण केला. येरवडा परिसरात एमआयएमच्या अश्विनी लांडगे या विजयी ठरल्या.
प्रभाग क्र. १८ मध्ये मध्ये रेखा चव्हाण (३०३४), फरिदा खान (३३६७), फरिद खान (२४६९), उमर बागवान (३९२३) या उमेदवारांनी मते मिळाली.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांविरोधात लढत झाल्याचे पहायला मिळाले. एमआयएम पक्षाच्या महिला उमेदवारांनी अटीतटीची लढत दिली. त्यात एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांनी शिवसेनेच्या तृप्ती शिंदे यांना शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत दिली. प्रभाग क्रमांक सहा अ मधून शिवसेनेचे अविनाश साळवे, ब मधून शेवा चव्हाण आणि ड मधून संजय भोसले यांनी विजय मिळवला आहे. साळवे यांना एमआयएमच्या शैलेंद्र भोसले यांनी लढत दिली. प्रभाग क्र. १९ मध्ये अफसरी शेख (४५८६), शेख हसीना (३४५४), जुबेर शेख (३७१६) यांनी भाजपच्या उमेदवारांना चुरशीची लढत झाली.
(प्रतिनिधी)

Web Title: MIM opened accounts in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.