खाणींमुळे होतोय नागरिकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:18 AM2021-02-21T04:18:49+5:302021-02-21T04:18:49+5:30

चौकट नांदोशी-सणसनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून दगड खाणी व क्रशर सुरू आहेत. दगडफोडीसाठी येथे सुरुंग लावण्यात येत असल्याने परिसरातील ...

Mines are causing trouble to the citizens | खाणींमुळे होतोय नागरिकांना त्रास

खाणींमुळे होतोय नागरिकांना त्रास

Next

चौकट

नांदोशी-सणसनगर भागात गेल्या अनेक वर्षांपासून दगड खाणी व क्रशर सुरू आहेत. दगडफोडीसाठी येथे सुरुंग लावण्यात येत असल्याने परिसरातील इमारतींना हादरे बसून काही घरांना तडे जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत काही नागरिकांनी तहसीलदाराकडे तक्रारसुद्धा दाखल केली आहे.

चौकट :

१. आरोग्यावर होतोय परिणाम...

या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिडच‌िड वाढणे, एकाग्रता कमी असणे, एकमेकांशी संवाद साधताना त्रास होणे, झोप नीट न लागणे आणि तात्पुरते बहिरेपण, असे त्रास प्रामुख्याने आढळून येत आहेत. या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये चिडच‌िड वाढणे, एकाग्रता कमी असणे, एकमेकांशी संवाद साधताना त्रास होणे, झोप नीट न लागणे आणि तात्पुरते बहिरेपण, असे त्रास प्रामुख्याने आढळून येत आहेत.

२. ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष

‘प्रदूषण हे केवळ हवेपुरतेच मर्यादित आहे, असा समज आहे. परंतु ध्वनीप्रदूषणसुद्धा तितकेच घातक आहे. खाणींमधील ध्वनी प्रदूषणाची तीव्रता जास्तच आहे. पूर्वी खाणींमधील काम हे मोठ्या प्रमाणावर मजुरांद्वारे होत असे. परंतु, आता या कामात मश‌िन्सचा वापर वाढल्याने ध्वनीसोबतच कंपनांचाही त्रास वाढला आहे.

कोट:

निसर्गासह वन्यजीव व मानवी जीवनाला हानी पोचवणाऱ्या त्याचबरोबर पवित्र किल्ले सिंहगडाच्या डोंगररांगांमधील दगडखाणी बंद करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल - रवींद्र आखाडे, प्रदेशाध्यक्ष, छावा ग्रुप

Web Title: Mines are causing trouble to the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.