मिनी बस-टिप्पर धडकेत तिघांचा मृत्यू

By admin | Published: April 30, 2017 10:33 PM2017-04-30T22:33:30+5:302017-04-30T22:33:42+5:30

बिलोली-कासराळी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Mini Bus-Tipper Death Three Deaths | मिनी बस-टिप्पर धडकेत तिघांचा मृत्यू

मिनी बस-टिप्पर धडकेत तिघांचा मृत्यू

Next


ऑनलाइन लोकमत
बिलोली/कासराळी (जि़नांदेड),दि. 30 - पुण्याहून तेलंगणाकडे निघालेल्या मिनी बस व वाळू टिप्परच्या धडकेत तीन ठार व नऊ जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे ५़३० वाजता बिलोली-कासराळी दरम्यान महामार्गवर घडली़ मयतासह सर्व जखमी एकाच कुटुंबातील असून मिनी बस चालकाची स्थिती अत्यंत गंभीर आहे़ जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले़ टिप्पर चालक घटनेनंतर फरार झाला आहे़


पुणे येथील स्वारगेट येथे राहणारे कडतन हे कुटुंबीय तेलंगणातील खुदनापूर येथील देवीचे दर्शन घेण्यासाठी मिनी बस क्ऱ एम़एच़१२-एच़बी़ १९५७ या वाहनाने निघाले़ कासराळी संपल्यानंतर महावितरण कंपनीच्या ३३ के़व्ही़ विद्युत केंद्राजवळ बिलोलीहून येणाऱ्या वाळूच्या टिप्पर क्ऱ एम़एच़४-एफ़जे़ -८५७६ ची समारोसमोर जोरदार धडक झाली़ या धडकेत दोन सख्ख्या बहिणी व जावा विजयमाला कडतन (वय ५०) व जयश्री कडतन (वय ५५, रा़स्वारगेट, पुणे) जागीच ठार झाल्या़ तर त्यांचा नातू सार्थक मगजी कडतन (वय ११) हा नांदेडला उपचारासाठी नेत असताना मृत पावला़ हा अपघात इतका भीषण होता की टिप्परच्या धडकेने मिनी बसच्या डाव्या बाजूकडील संपूर्ण बाजू कापल्या गेली़ यामध्ये या बाजूला बसलेले सर्वच जण जखमी झाले़ बसचालक विजय पंडित यांची स्थिती गंभीर असून तो मृत्यूशी झुंज देत आहे.


जखमीमध्ये गंगाराम कडतन (वय ८०), कस्तुरी कडतन (५०), रेखा कडतन (२७), गणपती कडतन (६२), पंकज कडतन (२३), वरद चित्ते (१२), प्रथमेश कडतन (८), किर्ती मगजे (५०) (सर्व रा़स्वारगेट पुणे) यांचा समावेश असून सर्वांना बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ़नागेश लखमावार, डॉ़प्रदीप ठक्करवाड, डॉ़तानाजी लहुटे, परिचारिका कल्पना ठाकूर, जयश्री पाटील, अनू चव्हाण, कालिंदा ढोबळे, सोमेश बिल्डा, दीपक गायकवाड, माधव तुंबरफळे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीउपचार करून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविले़ ज्यामध्ये चालक विजय पंडित यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे़ त्यांच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सदरील घटना दोन्ही चालकाच्या नजरचुकीमुळे व झोपेमुळे झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले़ अपघातातील टिप्पर हा मांजरा नदीतील नागणी घाटावरून वाळूची वाहतूक करीत होता़ बिलोली पोलिसांनी टिप्पर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़ तपास पोलिस उपनिरीक्षक एम़एस़चव्हाण करीत आहेत़

सख्ख्या बहिणी़ जावा अन् शेवटही सोबतच
गंगाराम कडतन यांचा संपूर्ण परिवार पुणे येथे राहत असून आपल्या नातवाच्या जावळं कार्यक्रमास तेलंगणातील खुदनापूर देवीचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी सकाळी पुण्याहून निघाले होते़ गंगाराम कडतन यांच्या दोन सुना विजयमाला कडतन व जयश्री कडतन या सख्ख्या बहिणी मुळच्या गुलबर्गा येथील असून त्या सख्ख्या जावा आहेत़ हे सर्व कुटुंब पारिवारिक कार्यक्रमासाठी तेलंगणात जात होते़ परंतु नियतीला हे मान्य नसून साखर झोपेतच झालेल्या अपघातात दोन्ही सख्ख्या बहिणींचा घटनास्थळीच अंत झाला़ दरम्यान, कडतन कुटुंबीय मुळचे वसमत (जि़हिंगोली) येथील असून गत अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक झाल्याची माहिती मिळाली़

Web Title: Mini Bus-Tipper Death Three Deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.