कळसला रुग्णसंख्या वाढल्याने मिनी लाॅकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:39+5:302021-09-08T04:16:39+5:30
कळस गावात व परिसरात बिरंगुडी, पिलेवाडी, गोसावीवाडी, बागवाडी भागात गेल्या पाच दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ...
कळस गावात व परिसरात बिरंगुडी, पिलेवाडी, गोसावीवाडी, बागवाडी भागात गेल्या पाच दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापना किराणा दुकाने व सर्वच व्यावहार सोमवार ते रविवार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंतच चालू राहणार आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा मेडिकल व कृषी सेवा सुरू राहणार आहेत. सर्व दुकानदारांना कोरोना चाचणी सक्ती करण्यात आली आहे. तसेच मास्क लावून सामाजिक अंतर ठेवून सॅनिटायझर व हॅंडवॉश वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्य चौकातील विक्रेत्यांना बाजारातील पटांगणावर बसण्याचे सांगण्यात आले आहे. सरपंच वृषाली पाटील, पोलीस पाटील तुकाराम खाडे, ग्रामसेवक डी. बी. वाघ यांनी आदेश काढले असून नियमाचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.
................
कळस गावात आज ११४ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत, सक्रिय रुग्णसंख्या १८ आहे. लसीकरणाचा उच्चांक केला असून ५१०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
अशोक तारडे, प्राथमिक आरोग्य अधिकारी
कळस