पुण्यात रविवारी मिनी मॅरेथॉन
By admin | Published: January 25, 2017 02:26 AM2017-01-25T02:26:45+5:302017-01-25T02:26:45+5:30
पांढरे डाग (कोड) असणाऱ्या व्यक्तींचा श्वेता असोसिएशन हा स्वमदत गट. दर वर्षी जनजागृतीसाठी मिनी मॅराथॉन आयोजित
पुणे : पांढरे डाग (कोड) असणाऱ्या व्यक्तींचा श्वेता असोसिएशन हा स्वमदत गट. दर वर्षी जनजागृतीसाठी मिनी मॅराथॉन आयोजित करीत असतो. येत्या रविवारी (दि. २९) कॅम्पमधील बी. जे. मेडिकल कॉलेज ग्राउंड येथून सकाळी ६ वाजता या रनची सुरुवात होणार आहे.
‘लोकमत’च्या सहकार्याने हा उपक्रम होणार असून फ्री रनर्स ग्रुप आणि बी. जे. मेडिकल यांचा प्रमुख सहभाग असेल. सर्वसामान्य जनतेचा सहभाग असावा, यासाठी ३ किमी आणि ५ किमी चालणे किंवा धावणे आणि १० किमी धावणे, अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
या प्रसंगी डॉ. के. एच. संचेती अध्यक्ष म्हणून तसेच पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, खासदार अनिल शिरोळे, बी. जे. मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, आमदार मेधा कुलकर्णी, आयएमए अध्यक्ष डॉ. मोहन जोशी उपस्थित राहणार
आहेत. (प्रतिनिधी)