पुणे परिसरातील किमान तापमानात वाढ होणार, हवामान विभागाचा अंदाज

By श्रीकिशन काळे | Published: December 29, 2023 07:27 PM2023-12-29T19:27:52+5:302023-12-29T19:28:19+5:30

दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमधील किमान तापमानात वाढ होत आहे....

minimum temperature in Pune area will increase, predicts the Meteorological Department | पुणे परिसरातील किमान तापमानात वाढ होणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे परिसरातील किमान तापमानात वाढ होणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे : पुण्यात पुढील दोन दिवस आकाश अंशत: निरभ्र राहील आणि १ जानेवारीनंतर दुपारी व सायंकाळी आकाश ढगाळ राहण्याचा अंंदाज आहे. तसेच पुणे परिसरातील कमाल तापमानात घट होणार आहे आणि किमान तापमानात २ डिग्री सेल्सिअने वाढ होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमधील किमान तापमानात वाढ होत आहे. उत्तर भारतात थंडीचे प्रमाण कायम असून, राज्यातील किमान तापमानात काही दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील पाचही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील. सकाळी वातावरणातील थंडी कायम असून, काही ठिकाणी धुकेही पडत आहे.

यंदा थंडीच नाहीच-
पुण्यातील सर्वात कमी किमान तापमान यंदा ९ अंश सेल्सिअस पाषाणला नोंदवले गेले. त्यामुळे खूप कडाक्याची थंडी जाणवली नाही. २०१८ मध्ये मात्र ५.९ किमान तापमान झाले होते. तशी थंडी यंदा पुणेकरांना अनुभवता आली नाही. या वर्षी किमान व कमाल तापमानात सतत चढ-उतार पहायला मिळाली.

शहरातील किमान तापमान

हवेली : ११.७
एनडीए : ११.७

पाषाण १२.०
कोरेगाव पार्क : १७.१

मगरपट्टा १८.९
वडगावशेरी : १९.२

Web Title: minimum temperature in Pune area will increase, predicts the Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.