शहरात ७़४ अंश सेल्सिअस नीचांकी किमान तापमान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 01:47 AM2018-12-29T01:47:45+5:302018-12-29T01:47:58+5:30
देशात सर्वत्र थंडीचा लाट दिसून येत असून त्याचा परिणाम शुक्रवारी पुणे शहरात दिसून आला.
पुणे : देशात सर्वत्र थंडीचा लाट दिसून येत असून त्याचा परिणाम शुक्रवारी पुणे शहरात दिसून आला. या हंगामातील सर्वांत नीचांकी किमान तापमान ७.४ अंश सेल्सिअस शुक्रवारी पुण्यात नोंदविण्यात आले. २० डिसेंबर २०१० रोजी ६़५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती.
हवामानातील चढ-उतारामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात कधी थंडीचा कडाका तर कधी हिवाळ्यात उन्हाचा तडाखा
जाणवत होता़ १७ डिसेंबरला या हंगामातील सर्वांत कमी किमान तापमान ८़३ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती.
१९ डिसेंबरला शहरातील किमान तापमान ९़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते़ त्यानंतर २० डिसेंबरला त्यात आणखी घट होऊन ते ८़८ अंश सेल्सिअस नोंदविले़ त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाºयांना अडथळा निर्माण झाल्याने शहरातील तापमानात वाढ होऊन ते १५़९ अंशांपर्यंत वाढले होते़ त्यानंतर पुढील दोन दिवसांत किमान तापमानात पुन्हा घट होऊ लागली़ गुरुवारी सकाळी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात शुक्रवारी आणखी घट होऊन ते ७़४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.