मेट्रोचा किमान तिकीट दर १० रुपये ; सवलती नसणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:08+5:30

पीएमपी ही प्रवासी सेवा व मेट्रो यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार

Minimum ticket rate of Metro Rs 10; There will be no discounts | मेट्रोचा किमान तिकीट दर १० रुपये ; सवलती नसणार 

मेट्रोचा किमान तिकीट दर १० रुपये ; सवलती नसणार 

googlenewsNext
ठळक मुद्देमेट्रो पीएमपी परस्परांना पूरक ठेवण्याचा प्रयत्नजमिनीपासून २० ते २२ मीटर उंचीवरून धावणाऱ्या मेट्रोबाबत त्यामुळे उत्सुकता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी म्हणून महामेट्रोकडून मेट्रो कार्ड

पुणे : संपुर्ण वातानुकूलीत असल्यामुळे मेट्रोचा तिकीट दर बराच असेल असा समज असणाऱ्यांना मेट्रो ने दिलासा दिला आहे. पहिल्या २ किलोमीटरला हा दर १० रुपये असणार आहे. मेट्रोच्या प्रकल्प अहवालात नमुद केले होते तेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. पीएमपी ही प्रवासी सेवा व मेट्रो यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार असून स्पर्धेपेक्षा ते परस्परांना पूरक असावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मेट्रोचे काम आता शहरात दिसू लागले आहे. जमिनीपासून २० ते २२ मीटर उंचीवरून धावणाऱ्या मेट्रोबाबत त्यामुळे उत्सुकता वाढू लागली आहे. त्यातही मेट्रोचा चकचकीतपणा, संपुर्ण वातानुकूलित असणे यामुळे मेट्रोचा तिकीट दर बराच जास्त असेल अशी चर्चा आहे. महामेट्रोकडे याबाबत विचारणा केली असता प्रकल्प अहवालात नमुद केला त्याप्रमाणेच दर ठेवण्याचे बंधन महामेट्रोवर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पहिल्या २ किलोमीटरसाठी १० रुपये, २ ते ४ किलोमीटरसाठी २०, ४ ते १२ किलोमीटरसाठी ३०, १२ ते १८ किलोमीटरसाठी ४० व १८ च्या पुढे ५० रुपये  असा दर असेल.
त्यानंतर दर वाढवायचे असतील तर त्यासाठी एक समिती स्थापन केली जाते. त्यात जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त तसेच अन्य सरकारी आस्थापनांच्या प्रमुखांसमवेतच प्रवासी प्रतिनिधी म्हणूनही काहीजणांचा समावेश असतो. महामेट्रो व्यवस्थापनाने या समितीकडे दरवाढीचा प्रस्ताव द्यायचा, मुद्दे स्पष्ट करायचे व नंतर त्यावर समितीमध्ये चर्चा होऊन दरवाढीला मंजूरी दिली जाईल किंवा नाकारली जाईल. मात्र सध्या तरी प्रकल्प अहवालात दिले आहे तेच दर असणार आहेत.
प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी म्हणून महामेट्रोकडून मेट्रो कार्ड वितरीत करण्यात येईल. त्यावरून पीएमपी, रिक्षा तसेच मेट्रोसाठीच्या तिकीटाचे पैसे देता येणार आहे. त्याशिवाय पैसे जमा करून तिकीट घेणे ही नेहमीची पद्धतही असणार आहे. मेट्रोच्या एका डब्यात किमान २५० व कमाल ३०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. अशा तीन डब्यांची एक मेट्रो ट्रेन असेल. प्रत्येक डब्यात ५० ते ६० प्रवाशांसाठी आसन व्यवस्था व अन्य प्रवासी मधल्या भागात स्टॅडिंग (ऊभे राहून) असे असणार आहे. तिकीट काढल्यानंतरच मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करता येणार आहे.

-----------------------------
मेट्रो पीएमपी स्पर्धा नाही....
     

मेट्रोची वैशिष्ट्ये
-- संपुर्ण मेट्रो वातानुकूलीत असेल
-- प्रत्येक स्थानकात मेट्रो ३० सेकंद थांबेल
-- वाहतूकीचा अडथळा नसल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल
-- मेट्रो मध्ये कोणालाही दरात सवलत नाही
-- लहान मुलांसाठी ‘हाफ तिकीट’चा सध्या तरी प्रस्ताव नाही
-- एकावेळी ९०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता
 

Web Title: Minimum ticket rate of Metro Rs 10; There will be no discounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.