कृषी पर्यटन केंद्र चालकांशी कृषिमंत्र्यांनी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:16 AM2021-09-09T04:16:46+5:302021-09-09T04:16:46+5:30

रानफुला कृषी पर्यटन केंद्र मौजे ईगळून ता. मावळ येथे राज्यातील कृषी पर्यटक केंद्र चालकांशी कृषी मंत्री भुसे यांनी संवाद ...

The Minister of Agriculture interacted with the operators of the agri-tourism center | कृषी पर्यटन केंद्र चालकांशी कृषिमंत्र्यांनी साधला संवाद

कृषी पर्यटन केंद्र चालकांशी कृषिमंत्र्यांनी साधला संवाद

googlenewsNext

रानफुला कृषी पर्यटन केंद्र मौजे ईगळून ता. मावळ येथे राज्यातील कृषी पर्यटक केंद्र चालकांशी कृषी मंत्री भुसे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. बी. बोटे, पर्यटनचे उपसंचालक सुप्रिया करमरकर, रानफुला कृषी पर्यटन केंद्राचे श्रीकांत चव्हाण आणि राज्यातील कृषी पर्यटक केंद्रचालक उपस्थित होते.

भुसे म्हणाले, कृषी पर्यटन धोरण राबविण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांना या धोरणाची व संकल्पनेची माहिती व्हावी म्हणून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कृषी पर्यटन केंद्र प्रत्यक्ष चालविताना येणाऱ्या समस्या सोडवणे. पर्यटन केंद्रांना सुलभ कर्जपुरवठा, मार्केटिंगसाठी मदत करणे, शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे तसेच जगभर व देशभरातील कृषी पर्यटन तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे आदी उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे कृषी पर्यटन केंद्रावर आयोजित करणे. कृषी पर्यटनाच्या संबंधीत शासनाच्या इतर विभागाचे परिपत्रक काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसायाची एक नवीन संधी उपलब्ध करून देणे. ग्रामीण अर्थकारणाला चालना देणे. शहरी पर्यटकांना शांत सुरक्षीत व पर्यावरणपूरक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी कृषी पर्यटनाला चालना देणार आहे.

Web Title: The Minister of Agriculture interacted with the operators of the agri-tourism center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.