राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 10:41 AM2022-02-15T10:41:15+5:302022-02-15T10:44:08+5:30

बारामती : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (datta bharne) यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. इंदापूर येथील कार्यक्रमात व मुख्यमंत्री म्हणून भरणे यांनी ...

minister of state dattatraya bharane forgot the name of the chief minister uddhav thackeray and devendra fadnavis | राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 

googlenewsNext

बारामती: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (datta bharne) यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाचा विसर पडला. इंदापूर येथील कार्यक्रमात व मुख्यमंत्री म्हणून भरणे यांनी  देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) तर उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) असा  उल्लेख केला. यानंतर व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची चूक सुधारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आहेत असे सांगितले. तर उपस्थितांनी पहाटेचा शपथविधी अजूनही लक्षात आहे का? असा शेरा मारला.

 इंदापूर येथील एका खाजगी कार्यक्रमांमध्ये सोमवारी ( दि. 15) राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. राज्यमंत्री भरणे म्हणाले,  महा विकास आघाडीचे जे घटक आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील या वाक्यावर  व्यासपीठावर उपस्थित मंडळींनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत अशी आठवण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना करून दिली. यावर भरणे यांनी होय का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत असे विचारले. तसेच उपस्थितांनी पहाटेचा शपथ विधी अजूनही लक्षात आहे का असा मिश्किल शेरा देखील मारला.

या नंतर सारवासारव करत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सतत डोक्यात खूप विचार असल्यामुळे असे होते. त्याला काय करता असे राज्यमंत्री दत्तात्रेय  भरणे म्हणाले. या कार्यक्रमानंतर भरणे यांचा हा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

Web Title: minister of state dattatraya bharane forgot the name of the chief minister uddhav thackeray and devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.