... मात्र शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये : रामदास आठवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 07:21 AM2021-07-17T07:21:21+5:302021-07-17T07:22:55+5:30

जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याचं आठवले यांचं वक्तव्य. ओबीसींचा डाटा अंदाजे‌ तयार करण्यात आलेला असल्यानं केंद्र सरकार तो देत नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण.

minister ramdas athavle speaks on ncp leader sharad pawar president obc senses needed | ... मात्र शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये : रामदास आठवले 

... मात्र शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये : रामदास आठवले 

googlenewsNext
ठळक मुद्देजातनिहाय जनगणना आवश्यक असल्याचं आठवले यांचं वक्तव्य. ओबीसींचा डाटा अंदाजे‌ तयार करण्यात आलेला असल्यानं केंद्र सरकार तो देत नाही, आठवलेंचं स्पष्टीकरण.

पुणे : “शरद पवार हे धोकेबाज नेते नाहीत. ते देशाचे नेते आहेत. राष्ट्रपतिपदाचे उमेदवार पवार असतील‌ तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नये,” असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. पुणे दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आठवले म्हणाले, “ओबीसी समाजाची जनगणना आवश्यक आहे. जातनिहाय जनगणना झाल्याने जातीयवाद वाढेल या मताचा मी नाही. जातनिहाय जनगणना झाली तर कोणत्या जातीला किती प्रतिनिधित्व द्यायचे हे नेमकेपणाने ठरविता येईल.” ओबीसींचा डाटा अंदाजे‌ तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार तो देत नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.

आठवले म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे सत्तास्थानी आलेल्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये ताळमेळ नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेने भाजपसोबत यावे. आमदार फुटतील या भीतीने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पुढे ढकलण्यात येत आहेत. मराठा आरक्षणाचे अधिकार राज्याला देण्यासाठी संसदेने ठराव मंजूर करावा, अशी मागणी आम्ही केली आहे. ईडी कारवाईशी केंद्र सरकारचा काही संबंध नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: minister ramdas athavle speaks on ncp leader sharad pawar president obc senses needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.