वन राज्यमंत्र्यांचा जाचकवस्ती गावकऱ्यांनी केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:57+5:302021-03-15T04:09:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सणसर : जाचकवस्ती या गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सणसर : जाचकवस्ती या गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे २० लाख रुपयांचा निधी गावाला मिळाला. त्याचबरोबर ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये तसेच ३९ फाटा रस्त्यासाठी २५ लाख तर रणवरेमळा रस्त्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद फंडातून गावाला मंजूर झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी आज वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.
या वेळी जाचकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर, सरपंच सुशील पवार, उपसरपंच प्रकाश नेवसे, महेश निंबाळकर, सिद्धार्थ जाचक, रमेश जामदार, अभयसिंह निंबाळकर, ॲड. विलास खटके, डी. एस. रणवरे, अशोक काळे, सागर भोईटे, विशाल काळे, सुनील रणवरे, किरण शितोळे, हनुमंत जामदार, दत्तात्रय शिंदे, अनिकेत निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून गावाला हा निधी मिळाला. त्यामुळे गावच्या विकासात भर पडली आहे. गाव एका वेगळ्या उंचीवर आपले नाव सतत ठेवेल, गावकऱ्यांना घरोघरी स्वच्छ पाणीपुरवठा देण्यासाठी या योजनेचा मोठा उपयोग होणार आहे.
- विक्रमसिंह निंबाळकर, माजी उपसरपंच ग्रामपंचायत जाचकवस्ती