अल्पवयीन मुलीला धमकावून उकळले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 04:10 PM2018-05-23T16:10:53+5:302018-05-23T16:10:53+5:30
ओळख झालेल्या एका १७ वर्षीय मुलीशी जवळीक करून आरोपीने शरीर सुखाची मागणी करत तिचा पाठलाग सुरु केला आणि यातून सुटका पाहिजे असल्यास वारंवार पैशांची मागणी केली.
पिंपरी : खासगी शिकवणीसाठी एकाच ठिकाणी नेहमी भेट होत असल्याने ओळख झालेल्या एका १७ वर्षीय मुलीशी जवळीक करून आरोपीने शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्यास मुलीने नकार दिला. आरोपीने तिचा पाठलाग सुरूच ठेवला, ससेमिऱ्यातून सुटकारा पाहिजे असेल तर पैसे दे असे म्हणत एकदा १५ हजार आणि दुसऱ्यावेळी १० हजार रुपये अशी २५ हजारांची रक्कम उकळली. संशयित आरोपी अभिषेक नारायण शितोळे (रा. जुनी सांगवी) याच्याविरूद्ध सांगवी पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी ज्या ठिकाणी शिकवणीसाठी जात होती. त्याठिकाणी एका तरूणाशी तिची ओळख झाली. तो तरूण वारंवार तिचा पाठलाग करू लागला. त्यामुळे मुलीने त्याच्याशी बोलणे टाळले. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यास मुलीने नकार दिला. त्यानंतरही तो तिचा पाठलाग करत होता. तिच्या पाठीमागे लावलेला ससेमिरा हटविण्यासाठी त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. भीतीपोटी तिने एकदा १५ हजार आणि दुसऱ्यांदा १० हजार अशी २५ हजारांची रक्कम त्याला दिली. वारंवार पैशांची मागणी करू लागल्याने याप्रकरणी मुलीने कुटुंबियांना माहिती दिली. दोन्ही कुटुंबियांमध्ये या प्रकरणामुळे वादंगही झाला. आरोपीविरोधात सांगवी पोलिससांकडे गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एम टी शिंदे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.