बारामती | धक्कादायक! दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीला ओढून नेत बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 08:20 PM2022-06-11T20:20:39+5:302022-06-11T20:25:01+5:30

मुलीच्या आईची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार...

minor girl who went to a shop to buy soap was dragged away and sexually abused | बारामती | धक्कादायक! दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीला ओढून नेत बलात्कार

बारामती | धक्कादायक! दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीला ओढून नेत बलात्कार

googlenewsNext

बारामती : दुकानात साबण घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने समाज मंदिरात ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात शुक्रवारी (दि. १०) भर सकाळी घडला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी अभिमन्यू भारत लांडगे याच्या विरोधात बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलीचे वय १५ वर्षे ७ महिने आहे. ती अल्पवयीन पिडीत मुलगी  दुकानात साबण आणण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपीने तेथे येत तिच्या डाव्या हाताला धरले. तु माझ्याबरोबर समाज मंदिरात चल, तु जर आरडाओरडा केला तर मी तुला मारून टाकेन अशी धमकी देत तिला समाज मंदिरात ओढत नेले. तेथील दरवाजा पुढे ढकलत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आता गुपचुप घरी जा, कोणाला काही सांगू नको, नाही तर तुला जीवंत ठेवणार नाही, असा दम दिल्याचे फियार्दीत नमुद करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल घुगे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: minor girl who went to a shop to buy soap was dragged away and sexually abused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.