अल्पवयीन मुली घरातही नाही सुरक्षित; नात्यातल्या व्यक्तींकडूनच होताहेत अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 08:03 PM2019-12-20T20:03:15+5:302019-12-20T20:05:26+5:30

बिबवेवाडीत बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस

Minor girls are not safe at home | अल्पवयीन मुली घरातही नाही सुरक्षित; नात्यातल्या व्यक्तींकडूनच होताहेत अत्याचार

अल्पवयीन मुली घरातही नाही सुरक्षित; नात्यातल्या व्यक्तींकडूनच होताहेत अत्याचार

googlenewsNext
ठळक मुद्देदिवसेंदिवस महिलांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे : घरातील जवळच्या माणसांकडूनच अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. यामुळे घराच्याबाहेर मुलींच्या सुरक्षेचे प्रश्नचिन्ह उभे असतानाच आता घरातही त्यांना सुरक्षा मिळत नसल्याचे दिसून आले आहे. दिवसेंदिवस महिलांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे रक्ताच्या नात्यातील व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराचे नवे आव्हान त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. 
बिबवेवाडीत बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बापावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीनेच त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. मुलगी नऊ वर्षांची असतानाच तिच्या आईचे निधन झाले. वडील मोलमजुरीचे काम करतात. घरात दुसरी कुठलीही व्यक्ती नाही. मुलगी आणि बाप असे दोघेच राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून वडिलांकडून मुलीला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागले. फिर्यादी मुलगी झोपल्यानंतर आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पाषाण येथे देखील एका अनोळखी व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यात सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने अत्याचार केले. मुलगी खेळत असताना आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार पेठेत घडलेल्या घटनेत एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तसेच आरोपीने त्या मुलीस ‘तू मला खूप आवडतेस, असे म्हणून तिचा हात पकडून मला तुझ्याशी बोलायचे आहे’, असे बोलत अश्लील वर्तन केले. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अमन खान (रा. तोफखाना, साईबाबा मंदिराजवळ) यास अटक केली आहे.         

Web Title: Minor girls are not safe at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.