अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:26 AM2017-12-26T01:26:25+5:302017-12-26T01:26:36+5:30
शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. तिला त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर, ती गरोदर असल्याची बाब पुढे आली असून, तिच्यावर अत्याचार होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पीडित युवतीच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी मतिमंद असून, तिचे पालक पुण्यामध्ये राहतात.
मुलगी मतिमंद असल्यामुळे तिच्या पालकांनी तिला पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षणासाठी दाखल केले होते. ती आजारी असल्याने तिच्या पालकांनी तिला घरी नेले होते. परंतु, तिची तब्येत बरी झाल्याने तिला पुन्हा २१ डिसेंबर रोजी पाबळ येथे आणून सोडले होते. त्यांनतर २२ तारखेला तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला शिक्षकांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती गरोदर असल्याचे पुढे आले. त्यांनतर तिच्या पालकांनादेखील याबाबत माहिती देण्यात आली. तिच्या पालकांनी तातडीने पाबळ येथे येत तिला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली. यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.