टेरेसवर नेऊन अल्पवयीन मुलाने केला मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 17:56 IST2020-02-28T17:54:59+5:302020-02-28T17:56:04+5:30
अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वडगावशेरी येथे घडली आहे.

टेरेसवर नेऊन अल्पवयीन मुलाने केला मुलीवर बलात्कार
पुणे : अल्पवयीन मुलीला घराच्या टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कार करणा-या अल्पवयीन मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीच्या आजीने हा सारा प्रकार मुलाच्या आईला सांगितला असता मुलाच्या आईने संबंधित अल्पवयीन मुलीला नावे ठेवून मारहाण केली आहे.
वडगावशेरी येथे हा धक्कादायक प्रकार हा घडला आहे. याप्रकरणी पीडीतेच्या आजीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार मुलाला व त्याच्या आईला ताब्यात घेण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादीच्या आजीने आरोपीच्या आईला त्यांच्या मुलाने केलेल्या प्रकाराबद्द्ल सांगितल्यानंतरही त्यावर त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. याउलट अल्पवयीन मुलीलाच मारहाण केल्याची तक्रार फिर्यादी यांनी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आपली नात घराच्या ओट्यावर दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरु केली. टेरेसवर शोध घेण्याकरिता गेले असताना यांना ती त्यांच्या शेजारी राहणा-या मुलासोबत दिसली. आरोपी मुलाने त्या अल्पवयीन मुलीस गादीवर झोपवले होते. आणि तो तिच्यावर बलात्कार करीत असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. झाल्या प्रकाराबाबत फिर्यादीच्या आजीने आरोपी मुलाच्या आईला सांगितले. त्यावर आरोपीच्या आईने अल्पवयीन मुलीला नावे ठेवून तिला हाताने मारहाण केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बनसवडे हे करीत आहेत.