पिंपरी-चिंचवड: अल्पवयीन मुलांना लागला गाडी चोरण्याचा नाद, चोरीत मुलींचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 05:36 PM2021-11-23T17:36:40+5:302021-11-23T17:37:20+5:30
पिंपरी: अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे ही मागील काही वर्षांपासून मोठी समस्या बनली आहे. विशेषत: शहरी भागात बाल गुन्हेगारीचे प्रमाण ...
पिंपरी: अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे ही मागील काही वर्षांपासून मोठी समस्या बनली आहे. विशेषत: शहरी भागात बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चालू वर्षात गुन्हेगारी कृत्य केल्याप्रकरणी १३५ अल्पवयीन मुलांवर ११० गुन्हे दाखल आहेत. दाखल झालेल्या गुन्हांमध्ये सर्वाधिक वाहन चोरीप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. वाहन चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांवर ४० गुन्हे दाखल आहे. यामध्ये ३१ मुलांचा समावेश होता.
यामध्ये १८ मुलांवर गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १३ गुन्हे दाखल झाले असून, याप्रकरणी २६ मुलांवर गुन्हे दाखल आहेत. बलात्कार केल्याप्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले. तर याप्रकरणी ९ मुलांवर गुन्हे दाखल झाले. चोरीप्रकरणी २० गुन्हे दाखल झाले असून, १७ मुलांवर गुन्हा दाखल आहे. दरोडा आणि जबरी चोरीप्रकरणी २१ गुन्हे दाखल झाले; तर ३४ मुालंवर याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
चोरीत मुलींचा समावेश-
वाहन चोरीप्रकरणी ४० गुन्हे दाखल झाले असून, यामध्ये ३१ मुलांचा समावेश आहे. वाहन चोरीप्रकरणी गु्न्हा दाखल झालेल्या ३१ मुलांमध्ये एका मुलीचा समावेश आहे, तर चोरीप्रकरणी १७ मुलांवर गुन्हे दाखल झाले आहे. यामध्येदेखील एका मुलीचा समावेश आहे. यावरून मुलांबरोबर मुलीही गु्न्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे आगामी काळात मुलींनी गुन्हेगारीकडे वळू नये, यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
अल्पवयीन मुलांना कायद्याची जाणीव नसते. त्यामुळे ते गुन्हेगारी कृत्याकडे वळतात. मुलांना कायद्याची जाणीव करून देणे आवश्यक आहे. गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी आपल्या मुलांचा कोणी वापर करत आहे का? याची माहिती पालकांनी घ्यावी. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्यावतीने अशा मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रकल्प राबविले जातात. तसेच मुलांनी गु्न्हेगारीकेड वळू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त