मोक्का मधील बेपत्ता आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:19+5:302021-04-21T04:12:19+5:30
शिरूर सी. टी. बोरा कॉलेज रोडवरील गोळीबार प्रकरणातील व मोक्का गुन्ह्यातील बेपत्ता आरोपी गणेश चंद्रकांत कुर्लप (रा. शिरूर) याला ...
शिरूर सी. टी. बोरा कॉलेज रोडवरील गोळीबार प्रकरणातील व मोक्का गुन्ह्यातील बेपत्ता आरोपी गणेश चंद्रकांत कुर्लप (रा. शिरूर) याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद केले.
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार : २६ जानेवारी २०२१ रोजी गणेश चंद्रकांत कुर्लप हा सी.टी. बोरा कॉलेज रस्त्यावर मोटरसायकलवर येऊन प्रवीण गोकुळ गव्हाणे या युवकावर गोळीबार करून पसार झाला होता. त्यावरा मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर काल तो रामलिंग रोड येथे येणार असल्याची माहिती पोलिसांनी खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी गणेश कुर्लप याला रामलिंग रोड येथे अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड अमृतराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर,
सहायक फौजदार दत्तात्रय गिरिमकर,
पोलीस हवालदार जनार्दन शेळके, पोलीस नाईक राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे पोलीस कॉन्स्टेबल प्रसन्नजीत घाडगे,पो.ना दिनेश कुंभार,पो.कॉ विशाल कोथळकर,मपोका गव्हळीपो.कॉ अरुण पवार या पथकाने केली आहे.