दुर्घटनाग्रस्त बेघर झाले असहाय.!
By admin | Published: November 2, 2014 12:01 AM2014-11-02T00:01:59+5:302014-11-02T00:01:59+5:30
न:हे येथील पितांबर कॉम्पलेक्स या इमारतीतील 7 कुटुंबांना शहरातील नातलगांच्या घरांमध्ये आश्रय घेण्याची वेळ आली आहे.
Next
पुणो : न:हे येथील पितांबर कॉम्पलेक्स या इमारतीतील 7 कुटुंबांना शहरातील नातलगांच्या घरांमध्ये आश्रय घेण्याची वेळ आली आहे. मानवनिर्मित आपत्ती या दृष्टिकोनातून या दुर्घटनेकडे पाहणा:या प्रशासकीय यंत्रणोने एक वेळ चहा आणि बिस्किटांपलीकडे काहीही दिलेले नाही. उभा संसारच राडारोडय़ाखाली सापडून बेचीराख झाल्याने, अंगावरच्या कपडय़ांवर रस्त्यावर आलेल्या संकटग्रस्तांना
ना प्रशासनाकडून दिलासा
मिळाला ना कथित सामाजिक संघटनांकडून..
या इमारतीत सहाव्या मजल्यावर भाडेकरू म्हणून राहणा:या कल्पना प्रकाश यादव यांनी बांधकाम चांगले असते, तर आमच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती, असे सांगितले. घरातील लॅपटॉप, दागिने, मोबाईल, टीव्ही, फ्रीज, वॉ¨शंग मशिन, भांडी, धान्य यांच्यासह चारचाकी मोटारसुद्धा राडय़ाखाली सापडली आहे, असे सांगून त्यांनी सरकारकडून किंवा बिल्डरकडून नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली.
दरम्यान, राडारोडय़ाखाली सापडलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर, महसूल यंत्रणोने बचाव कार्य थांबविले असून, बांधकाम व्यावसायिक किशोरभाई वडगामा यास तो हटविण्याच्या सूचना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राडारोडय़ाखाली आपल्या संसारातील काही सापडते का, हे पाहण्यासाठी या कुटुंबीयांना सुन्नपणो थांबून राहावे लागत आहे.(प्रतिनिधी)
च्मानवनिर्मित आपत्तीमधील संकटग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था करता यावी, यासाठी मुख्यमंत्री निधीतून मदत मिळविण्याचा प्रस्ताव पाठवू, असे यंत्रणोतील अधिका:यांनी आज सांगितले. त्यामुळे राडारोडा कधी हटणार, आपल्याला निवारा मिळणार की नाही, या चिंतेत येथील रहिवासी आहेत.
च्बांधकाम व्यावसायिकाने आणि प्रशासकीय यंत्रणोनेही वा:यावर सोडलेले हे रहिवासी डोळ्यांत पाणी आणून ढिगा:याकडे शून्य नजरेने पाहत असल्याचे आज सकाळी दिसून आले.