Pune: मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला; मित्रांनीच त्याला गाडला होता

By नम्रता फडणीस | Published: August 13, 2024 06:11 PM2024-08-13T18:11:56+5:302024-08-13T18:12:37+5:30

भात लागवडीच्या बहाण्याने तरूणाला मित्रांनी राजगड तालुक्यात नेले होते

Missing person found sinhgad road police His friends buried him | Pune: मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला; मित्रांनीच त्याला गाडला होता

Pune: मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला; मित्रांनीच त्याला गाडला होता

पुणे: सिंहगड पोलिस स्टेशन येथे मिसिंगची नोंद असलेला व्यक्ती सापडला. मित्रांनीच त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी राजगड तालुक्यातील रांजणे गावात खड्डयात् गाडले असल्याचा धक्कादायक् प्रकार समोर आला आहे. भात लागवडीच्या बहाण्याने तरूणाला मित्रांनी राजगड तालुक्यात नेले. मग विजेच्या मनोऱ्यावरील तार कापून चोरी करण्यास प्रवृत्त केले. दुर्देवाने मनोऱ्यावरुन तोल जाऊन तरुण कोसळल्याने गंभीर जखमी झाला होता. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांनी दोघांना अटक केली.
    
बसवराज मंगळुरे (वय २२ सध्या रा. वडगाव बुद्रुक, मूळ रा. सोलापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रुपेश अरुण येनपुरे (वय २५), सौरभ बापू रेणुसे (वय २५, दोघे रा. पाबे, ता. राजगड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
    
बसवराज मित्र सौरभ रेणुसे याच्यासोबत १२ जुलै रोजी भात लावणीसाठी राजगड तालुक्यातील पाबे गावात गेला होता. १३ जुलै रोजी बसवराज आणि त्याचा मित्र सौरभ रेणुसे, रुपेश येनपुरे यांच्यासोबत रांजणे गावातील विजेच्या मनोऱ्यावर चढुन तार कापत चोरीचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी तार तुटून बसवराज काेसळला. गंभीर जखमी झालेल्या बसवराजला सौरभ आणि रुपेश यांनी उपचारासाठी रूग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. दोघांनी बसवराजला रुग्णालयात नेले नाही. त्याला पाबे घाटाजवळील जमिनीत खड्डा करुन जिवंत गाडले. दरम्यान, बसवराज बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. तक्रारीत तिने रूपेश येनपुरे आणि सौरभ रेणूसे यांच्यावर संशय व्यक्त केला होता.
    
 सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय यांनी रूपेशला ताब्यात घेतले. पोलिसांंचे पथक त्याला घेऊन पाबे गावात पोहोचले. वेल्हे पोलीस, तसेच निवासी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत सौरभने पोलिसांना खड्डा दाखविला. बसवराजला खड्ड्यात पुरण्यात आल्याचे उघड झाले. पोलिसांनी संबंधित गुन्हा वेल्हे पोलिसांकडे सोपविला आहे. आरोपी सौरभ आणि त्याचा मित्र रुपेश यांना वेल्हे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय, निकेतन निंबाळकर, सतीश नागुल, सुहास गायकवाड,सचिन गायकवाड, नवनाथ वणवे, शिवाजी क्षीरसागर, राजाभाऊ वेगरे, उत्तम तारु यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Missing person found sinhgad road police His friends buried him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.