‘मिशन आदित्य’ मोहीम यशस्वी ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:29+5:302021-06-28T04:09:29+5:30
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या (जेआरव्हीजीटीआय) वतीने न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील तारांगणामध्ये गेली ...
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) जगन्नाथ राठी व्होकेशनल गायडन्स अण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या (जेआरव्हीजीटीआय) वतीने न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील तारांगणामध्ये गेली आठ वर्षे आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्राचे अभ्यास वर्ग घेतले जातात. या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ''दररोज एक प्रश्न खगोलशास्त्रा''चा या उपक्रमाचा सलग एक हजार दिवसांचा प्रवास पूर्ण झाला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. रानडे बोलत होते. कार्यक्रमास डीईएसच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, तारांगणाचे विभागप्रमुख विनायक रामदासी आदी उपस्थित होते.
विनायक रामदासी म्हणाले, तारांगणात खगोलशास्त्राचे वर्ग घेण्याची प्रेरणा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या मुलाखतीतून घेतली. त्यांचे मामा दररोज एक गणित फळ्यावर लिहून ठेवत आणि नारळीकर ते सोडवत. ही आठवण नारळीकर यांनी साहित्य परिषदेतील एका कार्यक्रमात ऑगस्ट २०१८ मध्ये बोलताना सांगितली होती. त्याचे आम्ही अनुकरण केले.