‘मिशन फाइव्ह डे’

By admin | Published: October 30, 2014 11:33 PM2014-10-30T23:33:25+5:302014-10-30T23:33:25+5:30

गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. या पाश्र्वभूमीवर डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने जंगजंग पछाडले आहे.

'Mission Five Day' | ‘मिशन फाइव्ह डे’

‘मिशन फाइव्ह डे’

Next
पुणो : गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये डेंग्यूने अक्षरश: थैमान घातले आहे. या पाश्र्वभूमीवर डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने जंगजंग पछाडले आहे. यासाठी महापालिकेने ‘मिशन फाइव्ह डे’ नावाची मोहीम हाती घेतली असून, तब्बल सव्वा दोन हजार कर्मचारी या मोहिमेवर तैनात करण्यात आले आहेत.
 
शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रभावापुढे हतबल झालेल्या महपालिकेने आता  डेंग्यूच्या समूळ उच्चाटनासाठी  ‘मिशन फाइव्ह डे’  मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत महापालिकेचे तब्बल सव्वा दोन हजार कर्मचारी 30 च्या गटाने प्रत्येक प्रभागात पुढील पाच दिवस  जाऊन घरोघरी फिरून डासांची उत्पत्ती ठिकाणो शोधून ती नष्ट करणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी दिली. त्या अंतर्गत ज्या ठिकाणी डासांची पैदास आढळेल, तेथे औषध फवारणी करण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल 4क्क् धूरफवारणी मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
 गेल्या चार महिन्यांपासून शहरात डेंग्यूने थैमान घातले असून, शहरातील रुग्णांची संख्या 3 हजारांच्या घरात पोहोचली आहे. तर, उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने मागील महिन्यात ‘डेंग्यू हटाव मोहीम’ हाती घेतली होती. मात्र,  त्यास अपयश आले असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता या आजाराचे शहरातून समूळ उच्चाटन करण्यासाठी, महापालिका प्रशासनाने कंबर कसली असून, आज आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना.
 
कर्मचा:यांना ओळखपत्र सक्तीचे
4डेंग्यूची डासोत्पत्ती ठिकाणो शोधून ती नष्ट करण्यासाठी पुढील पाच दिवस महापालिकेकडून शहरातील प्रत्येक घर पिंजून काढण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभाग, कीटकनाशक विभाग; तसचे कंत्रटी पद्धतीने घेतलेल्या कर्मचा:यांची नियुक्ती करण्यात आली 
आहे.
4प्रत्येक प्रभागासाठी 3क् कर्मचा:यांचा समावेश असलेली पथके तयार करण्यात आली असून, ही पथके शहरातील प्रत्येक घरात जाऊन तपासणी करणार आहेत. त्या अंतर्गत प्रत्येक कर्मचा:याला 15क् घरांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, औषध फवारणीसाठी आरोग्य खात्याकडे असलेल्या 19क् मशिनसह नवीन 2क्क् मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
4प्रत्येक 3क् जणांच्या पथकांना चार मशिन फवारणीसाठी देण्यात येणार आहेत. तर, झोपडपट्टी भागात सकाळी, तर सोसायटय़ा आणि बंगल्यांमध्ये दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेत पालिकेचे कर्मचारी फिरून डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट  करणार आहेत. घरोघरी जाऊन भेटी देताना पालिकेचे ओळखपत्र गळ्यात सक्तीचे करण्यात आले आहे.
 
डेंग्यूची मोफत तपासणी
4खासगी हॉस्पिटलमध्ये डेंग्यूची तपासणी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात नागरिकांकडून शुल्क आकारले जाते. याला आळा घालण्यासाठी पालिकेच्या कमला नेहरू, गाडीखाना; तसेच नायडू या तीन हॉस्पिटलमध्ये डेंग्यूची मोफत तपासणी केली जाणार आहे. 
4या ठिकाणी प्लेटलेट व हिमोग्लोबीन तपासणीचे मशिन असल्याने, उपचारांसाठी येणा:या सर्व पेशंटची मोफत तपासणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या आजाराच्या तपासणीसाठी पालिकेच्या 17 नर्सिग होममध्ये रक्ताचे नमुने घेण्यात येणार असून, या आजाराच्या तपासणीचा अहवाल नागरिकांना पुढील 24 तासांच्या आत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या तपासणीसाठी शहरात सध्या नागरिकांना पाचशे ते सातशे रुपये मोजावे लागत आहे. या निर्णयामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. तसेच, ज्या रुग्णांना या आजाराची लक्षणो आहेत अथवा त्याची लागण झालेली आहे त्यांना पालिकेच्या दवाखान्यांमध्ये या पुढे क्रोसीन, आयव्ही फ्लूसह या पुढे व्हिटॅमीन बी-कॉम्पलेक्सची औषधे देण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
8क् जादा खाटांची उपलब्धता 
4शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेकडून कमला नेहरू रुग्णालयासह वाडिया हॉस्पिटलमध्ये खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आता कमला नेहरू रुग्णालयात 22क् डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 21क्, तर वाडिया रुग्णालयात 8क् खाटा रुग्णांसाठी उपलब्ध असणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. तसेच, या रुग्णांलयांमध्ये क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील 11 डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत.

 

Web Title: 'Mission Five Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.