केंद्राकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी तपासयंत्रणेचा गैरवापर - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 04:28 PM2021-10-16T16:28:12+5:302021-10-16T16:36:06+5:30

आमदारांसोबत बैठक सुरू असताना मीच उद्धव ठाकरेंचा हात धरून हेच मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते. सरकार तयार करत असताना ज्या सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होणार हे ठरले होते.

misuse eb cbi income tax ncb central government sharad Pawar | केंद्राकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी तपासयंत्रणेचा गैरवापर - शरद पवार

केंद्राकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी तपासयंत्रणेचा गैरवापर - शरद पवार

Next

पिंपरी-चिंचवड: आम्ही अनेक सरकारं पाहिलं, राज्यविषयी केंद्र सरकारचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असायचा. पण आता भाजप सरकारकडून तसं होताना दिसत नाही. विशेषतः भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात गैरवापर होताना दिसतो. ईडी, सीबीआय, आयकर विभाग यासारख्या यंत्रणेचा वापर करून गैरव्यवहार सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केला. ते पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, अजित पवारांच्या तीन भगिनींच्या घरी जाऊन आयकर विभागाने छापे टाकले. हा विषय कोर्टात असल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पण त्यात काहीही निष्पन्न होणार नाही. पण 14 ते 15 लोकं 5 दिवस छापे मारतात, त्यांचं काम संपल्यानंतरही त्यांना थांबायला सांगितलं जात होतं. एखाद्याच्या घरी इतके लोक पाठवून पाच-पाच दिवस ठेवून दबाव आणला जात आहे. चौकशी झाल्यावर पाहुण्याने जाणे आवश्यक होते. परंतु हा पाहूणा पाच-पाच दिवस मुक्काम करत होता. पाहूणा जेव्हा जात नाही तेच त्याची हकालपट्टी केली जाते. पाहुण्यांची काही चुकी नव्हती. त्यांना वरून तसे आदेश देण्यात आले होते.

निवडणुकीपूर्वी मी येणारच असे म्हणणारे काही परत आले नाहीत. तेव्हा राज्य अस्थिर करण्यासाठी ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या हाताखाली काम केले. 20 वर्षाहून अधिक काळ ते विधिमंडळत होते. पण त्यांनी पक्ष सोडला आणि त्यांच्याविरोधात खटले सुरू झाले. त्यांच्या जावयाविरोधात खटले सुरू झाले, असंही शरद पवार म्हणाले

सरकार बनवण्यात माझा ही किंचत हातभार होताः
आमदारांसोबत बैठक सुरू असताना मीच उद्धव ठाकरेंचा हात धरून हेच मुख्यमंत्री होतील असे सांगितले होते. सरकार तयार करत असताना ज्या सर्वाधिक आमदार शिवसेनेचे असल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होणार हे ठरले होते.

Web Title: misuse eb cbi income tax ncb central government sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.