सोशल मीडियाचा गैरवापरात अडीचपट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:28+5:302021-01-19T04:14:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात बहुसंख्य लोक घरात बसून कारभार करत असल्याने सहाजिकच इंटरनेट व सोशल साईटच्या ...

The misuse of social media has doubled | सोशल मीडियाचा गैरवापरात अडीचपट वाढ

सोशल मीडियाचा गैरवापरात अडीचपट वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊनच्या काळात बहुसंख्य लोक घरात बसून कारभार करत असल्याने सहाजिकच इंटरनेट व सोशल साईटच्या वापरात वाढ झाली. त्याचबरोबर त्याचा गैरवापर करुन फसवणुकीच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. सोशल मीडियाचा गैरवापर २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अडीच पटीने वाढला आहे. त्यात ट्वीटरचा गैरवापर १० पटानी वाढला आहे. त्याचवेळी सोशल मिडियावरुन धर्म विरोधी वक्तव्याच्या गैरप्रकारात अडीशे पट वाढ झाली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना घरी काम नसल्याने सोशल मीडियावर जास्त सक्रिय झाले होते. त्यातून एखादी पोस्ट आली तर त्याची खातरजमा न करता ती पुढे पाठविली जात होती. त्यातून त्याचा गैरवापर वाढत गेला. एकमेकांशी बदनामी करणारे मेसेज कोणताही विचार न करता पुढे पाठविले जात होते. त्यामुळे सोशल मीडियाच्या गैरवापराच्या तक्रारीत वाढ होत गेली. त्यातून सायबर पोलीस ठाण्यात तक्रारींचा ओघ वाढत गेला आहे. फेसबुकचा गैरवापर करुन २०१९ मध्ये ६३६ तक्रारी आल्या होत्या. त्यात मोठी वाढ होऊन २०२० मध्ये तब्बल १२४७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याचप्रमाणे इतर सोशल साईटचा गैरवापर करुन बदनामी करणे, बदनामीकारक व्हिडिओ यु टुबवर पलोड करणे, दुसर्याच्या नावाने बनावट ई मेल आयडी तयार करुन त्यादवारे फसवणूक करणे, अशा प्रकारात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

......

अपुरे मनुष्यबळ

पुणे शहरात सायबर चोरट्यांकडून फसवणूक झालेल्या साधारण ३० ते ३२ तक्रारी दररोज येत असतात. याबाबतची फसवणूक झालेल्यांची माहिती घेऊन त्यातील सायबर चोरट्यांचा माग काढण्यात सायबर पोलीस ठाण्यांचा बहुतांश वेळ जातो. त्यातील तपास हा खूप तांत्रिक असल्याने पोलिसांना त्यासाठी इतर सव्र्हिस पॉव्हायडरकडून कधी माहिती येईल, यावर तपास अवलंबून असतो. आर्थिक फसवणूक झालेल्या प्रकरणाचा तपास करण्यास मनुष्यबळ कमी पडत असते. त्यात फेसबुक, ट्वीटर यांच्याकडून माहिती येण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे सोशल मिडियाच्या गैरवापराच्या प्रकरणातील तपासाला सध्या खूप वेळ लागताना दिसत आहे.

सोशल मिडिया गैरवापर २०१९ २०२०

फेसबुक ६३६ १२४७

फेक प्रोफाईल/ अश्लिल मजकूर ३५४ ७७१

फेसबुक प्रोफाईल हॅक २७४ ४५८

ट्वीटर, बनावट प्रोफाईल ५ ५२

इतर सोशल साईट १८७ ८४२

बनावट मेल/ओळख चोरी ३१ २६६

सर्व साईटवरुन मर्फिंग ० ४९

धर्मविरोधी वक्तव्य ५ १२७

...................................................................

सर्व सोशल मिडिया गैरवापर ८२८ २१४१

Web Title: The misuse of social media has doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.