एमआयटी एडीटीच्या विद्यार्थ्यांनी पटकावले हॅकेथॉनचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:58+5:302021-08-15T04:13:58+5:30

एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगच्या प्राचार्य डॉ. रेणू व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार नॉन-कम्युनिकेटिव्ह आरएसोपंथीय रुग्णांसाठी या विद्यार्थ्यांनी आजारांमुळे होणाऱ्या वेदनांचे ...

MIT ADT students win first place hackathon prize | एमआयटी एडीटीच्या विद्यार्थ्यांनी पटकावले हॅकेथॉनचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

एमआयटी एडीटीच्या विद्यार्थ्यांनी पटकावले हॅकेथॉनचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Next

एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगच्या प्राचार्य डॉ. रेणू व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार नॉन-कम्युनिकेटिव्ह आरएसोपंथीय रुग्णांसाठी या विद्यार्थ्यांनी आजारांमुळे होणाऱ्या वेदनांचे भाग ओळखण्यासाठी आणि त्यासंबंधीचे भाकीत करण्यासाठी मल्टी-डिझाईन मॉडेल विकसित केले. तसेच अतिरिक्त मॉड्यूलद्वारे डेटा संकलन करून आणि वेदनांचा मागोवा घेऊन यशस्वी उपचार करण्यासंबंधीचे संशोधन केले. ट्यूमर फाउंडेशनतर्फे आयोजित पाच आठवड्यांच्या कार्यक्रमात जगभरातील ३०० हून अधिक संघ सहभागी झाले होते. यात एमआयटी स्कूल ऑफ बायोइन्जिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

दरम्यान, या स्कूलची विद्यार्थ्यांनी योगिता रानडे हिने “शाश्वत विकासासाठी कृषी, पर्यावरण आणि बायोसायन्समधील प्रगती” या विषयांवर ५ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मौखिक सादरीकरण केले. तिच्या या सादरीकरणाला सर्वोत्कृष्ट संशोधन अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंगचे संचालक प्रा. विनायक घैसास, प्राचार्य डॉ. रेणू व्यास, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे आणि डॉ. राहुल मोरे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन आणि नावीन्यपूर्ण यशाबद्दल अभिनंदन केले.

Web Title: MIT ADT students win first place hackathon prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.