एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचा २१ कंपन्यांसोबत शैक्षणिक सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:36+5:302021-07-31T04:11:36+5:30
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, स्पेस रॉकेट कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ...
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, स्पेस रॉकेट कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र राज, स्काय टचचे सीईओ संदीप जैन, स्काय झील टेक्नॉलॉजीच्या प्राची सोरटे जगताप, कृषी कट्टा कृषी सेवाचे तांत्रिक सल्लागार सुजित कैसर, सूरज बिल्डकॉनचे जगदीश पाटील, नफारीचे संचालक डॉ. विनय ओसवाल यांच्या २१ कंपन्यांच्या प्रमुखांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या वेळी एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. वसंत पवार, डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, प्रा. डॉ. अजीम शेख आदी उपस्थित होते.
मुद्रा मिशन फाइनासियल सर्विसेज, स्काय टच, अॅग्रीपार्क प्रायव्हेट लिमिटेड, स्काय झील टेक्नॉलॉजी, बायोमी, कृषी कट्टा कृषी सेवा, पुष्पक अॅग्रो फेरत, क्वालिटी इंफ्रास्ट्रक्चर, एस. पी. डिझाईन डेव्हलर्पस्, सुरज बिल्डकॉन, ए.जी. एस टेक्नॉलॉजीस् इंडिया, श्रीनिवास कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन, नाफारी, एक्सडीबीएस, बॉक्सनबीझ, ग्रोवेशन, पावक फूड्स, चितळे बंधु, आरएमएन बिल्ड, ॲड्रॉईट रिअल्टी, एमआरके ग्रुप इत्यादी कंपन्यांचा यात समावेश आहे. या विविध कंपन्यांच्या सहकार्याने तंत्रज्ञानाची कौशल्ये विद्यार्थांच्या व्यापक हितासाठी उपलब्ध होणे तसेच शैक्षणिक वातावरण यांच्यातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने हे सामंजस्य करार करण्यात आले आहे. या करारांमुळे एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, इंटर्नशीप आणि औद्योगिक प्रशिक्षण यांचा लाभ होणार आहे. डॉ. सुनीता कराड यांनी प्रस्तावना केली. प्रा. डॉ. अजीम शेख यांनी आभार मानले.