एम आय टी कॉलेजच्या वाहनांमुळे परिसरातील सोसायट्यांना त्रास; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 04:13 PM2022-09-20T16:13:55+5:302022-09-20T16:15:29+5:30
कोथरुड भागात एम आय टी कॉलेज असून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोने आहे
कोथरुड : भागातील एम आय टी कॉलेज परिसरातील बहुतांश रस्त्यांवर चारचाकी वाहने बेकायदा पार्किंग केली जात असल्याने सतत वाहतूक कोंडीचा त्रास सिग्मा सोसायटी व अन्य सोसायटीच्या नागरिकांना सहन करावा लागतो आहे. त्यामुळे सुरळीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी कोथरुड भागातील एम आय टी परिसरातील सोसायटीच्या माध्यमातून केली जात आहे.
कोथरुड भागात एम आय टी कॉलेज असून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोने आहे. एम आय टी कॉलेज मागील गेट परिसरातील या भागातील सिग्मा वन, शिल्पा सोसायटी, अभिलाषा सोसायटी, सावली सोसायटी, गिरीजा सोसायटी, यशश्री सोसायटी या सारख्या असंख्य सोसाट्या आहेत. येतील रहिवाशांना कामांकरिता जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. येथील वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी २० ते २५ मिनिटं कालावधी लागतो. विद्यार्थी एमआयटी कॉलेज मध्ये प्रवेश करताना आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा लावत आहेत. या वेळेस एम आय टी मधील कोणताही अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक त्यांच्या विद्याथ्र्यांचे नियंत्रण करण्याकरिता तिथे उपस्थित राहत नाहीत.
असे येथील सोसायटीच्या नागरिकांचे म्हणणे आहे.
या समस्यासंदर्भात येथील सोसायटीच्या माध्यमातून खेदपूर्वक निवेदन केले जात आहे. एम आय टी आपल्या परिसरात सर्व विद्याथ्र्यांच्या गाड्यांचे अंतर्गत पार्किंग करण्याची व्यवस्था करत नाही. एम आय टी मधील असणाच्या प्रशस्त मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्याऐवजी त्या मैदानाचा उपयोग सेमिनार करण्याकरिता करीत असते त्यांच्या परिसरामध्ये सर्व विद्यार्थ्यांची पार्किंगची व्यवस्था करीत नाही सभोवताली राहणाऱ्या नागरिकांना व दररोजचा दुर्गंधी सहन करावी लागते.
शिल्पा सोसायटी आणि सिग्मा सोसायटी या मधील रस्त्याच्या उजव्या बाजूस मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे आणि त्याकरिता मटेरियल घेऊन येणारे आणि बांधकामाचा राडारोडा घेऊन जाणारे असंख्य ट्रक्स, डम्पर्स, लॉरी, जेसीबी यांच्या येण्याजाण्यामुळे रस्त्यावर घाण- राडारोडा पडलेला असतो. अशा वाहनांच्या येण्याजाण्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व शाळकरी मुलांना रस्त्यावरून जाणे येणे धोकादायक झालेले आहे. असे निवेदन सोसायटीच्या वतीने वाहतूक विभाग व एम आय टी कॉलेज ला दिले आहे. या समस्यावर तोडगा न काढल्यास सोसायटीच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
''सदर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होत आहे. बेजबाबदारपणे सोसायटी लगत वाहने लावली जात आहे. दिवसभर व रात्रीही येथे गर्दी असते. एम आय टी च्या विद्यार्थी व व्हिजिटिंग साठी आलेले वाहने याचा आम्हाला आमच्या वाहनांना त्रास होतो.आम्ही या समस्ये एम आय टी ला असंख्य पत्र पाठवले आहे . तसेच वाहतूक विभागालाही आम्ही पत्र दिले आहे. परंतु कोणीही दखल घेत नाही. समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलन केले जाईल. - ऍड. रामचंद्र निर्मल( चेअरमन)''
''रात्री या परिसरात ट्रक, टिप्पर, मोठी वाहने राडावरोडा टाकतात याचा आम्हला खूप त्रास होत आहे. रस्त्याच्या कडेला मोठी वाहने असून रस्त्याने जा-ये करण्यासाठी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एम आय टी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये पार्किंग व्यवस्था करावी. कॉलेज मध्ये वाहने पार्किंग करून देत नाहीत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची वाहने सोसायटी परिसरातील भागात लावली जातात. - अस्मिता सोमण (सोसायटीतील रहिवाशी.)''