मांगणेवाडी ठाकरवस्तीची आमदार अतुल बेनके व अधिकाऱ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:31+5:302021-07-31T04:11:31+5:30

डोंगरउतारावर असलेली मांगणेवाडी-ठाकरवस्ती येथे ८० कुटुंबांची वस्ती आहे. जमिनीला मोठी भेग गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...

MLA Atul Benke and officials inspected Manganewadi Thakarvasti | मांगणेवाडी ठाकरवस्तीची आमदार अतुल बेनके व अधिकाऱ्यांनी केली पाहणी

मांगणेवाडी ठाकरवस्तीची आमदार अतुल बेनके व अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next

डोंगरउतारावर असलेली मांगणेवाडी-ठाकरवस्ती येथे ८० कुटुंबांची वस्ती आहे. जमिनीला मोठी भेग गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. संबंधित पार्श्वभूमीवर अनेकदा अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली; परंतु कार्यवाही झाली नसल्याने खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी आमदार अतुल बेनके यांना या संदर्भात माहिती दिली. याची दखल घेत तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी सतीश माळी, मंडलाधिकारी यांनी पाहणी केली. संभाव्य धोका ओळखून त्वरित वस्तीचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या. जिओलॉजिकल सर्व्हे करण्याची मागणी आमदार बेनके यांनी केली. जि. प. सदस्य देवराम लांडे, जि. प. सदस्य भाऊ देवाडे, संतोष ढोबळे, नीलेश घोलप, ओंकार घोलप, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आमदार अतुल बेनके यांनी मांगणेवाडी ठाकरवस्तीला प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन भेगा पडलेल्या व खचलेल्या भागाची केली पाहणी केली.

Web Title: MLA Atul Benke and officials inspected Manganewadi Thakarvasti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.