आमदार अतुल बेनके कोरोना युद्धा पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:32+5:302021-06-28T04:08:32+5:30
या वेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार आणि धीरज औटी यांच्या वतीने कोविड सेंटरला भेट देण्यात आलेल्या सोलर वॉटर ...
या वेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार आणि धीरज औटी यांच्या वतीने कोविड सेंटरला भेट देण्यात आलेल्या सोलर वॉटर प्रकल्पाचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी पांडुरंग पवार, माजी सभापती दीपक औटी, हाजी गुलामनबी शेख, माजी सरपंच एम. डी. घंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इर्शाद आतार, अकबर पठाण, बाळासाहेब औटी, शाकीर चौगुले, चंद्रकांत जाधव, जयसिंग औटी, प्रशांत आवटी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जाकीर पटेल, मुबारक तांबोळी, लियाकत पठाण, मेहबूब काझी, कलीम पटेल, प्रा. अशफाक पटेल, जिलानी पटेल उपस्थित होते. याप्रसंगी कोविड सेंटरमध्ये विशेष कामगिरी करणारे डॉ. स्वप्निल कोटकर, डाॅ. संदीप काकडे, डाॅ. गेनभाऊ शिंदे यांनाही कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबारक तांबोळी यांनी केले, तर आभार मेहबूब काझी यांनी मानले.
२७ बेल्हा पुरस्कार
ख्वाजा गरीब नवाज कोविड सेंटर यांच्या वतीने गौरविण्यात आलेले पुरस्कारार्थी.