पोलिस वसाहत आणि मामलेदार कचेरीच्या पुनर्विकासाला गती द्यावी;आमदार हेमंत रासने यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:52 IST2024-12-24T14:50:50+5:302024-12-24T14:52:29+5:30

मामलेदार कचेरीच्या बांधकामाकरिता २००४ साली प्रशासकीय मान्यता मिळाली

MLA Hemant Rasne demands that the redevelopment of the police colony and the magistrate's court should be accelerated. | पोलिस वसाहत आणि मामलेदार कचेरीच्या पुनर्विकासाला गती द्यावी;आमदार हेमंत रासने यांची मागणी

पोलिस वसाहत आणि मामलेदार कचेरीच्या पुनर्विकासाला गती द्यावी;आमदार हेमंत रासने यांची मागणी

पुणे : खडक पोलिस वसाहतीचे पुनर्वसन तसेच २००४ पासून संथ गतीने सुरू असणाऱ्या मामलेदार कचेरीच्या कामालादेखील गती देण्याची मागणी आमदार हेमंत रासने राज्य सरकारकडे केली.

खडक पोलिस वसाहत १२५ वर्षे जुनी ब्रिटिशकालीन आहे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी दिवस रात्र काम करणारे पोलिस या जुन्या वसाहतीतील अडीचशे फुटांच्या दुरवस्थेतील कौलारू निवासस्थानात जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तडे गेलेल्या भिंती, तुटक्या खिडक्या, सांड पाण्याची दुरवस्था अशा परिस्थितीचा सामना पोलिसांना करावा लागत असल्याची बाब मनाला वेदना देणारी आहे. त्यामुळे येथील १३९ निवासस्थानांचे पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी रासने यांनी केली.

मामलेदार कचेरीच्या बांधकामाकरिता २००४ साली प्रशासकीय मान्यता मिळाली, परंतु गेल्या २० वर्षांपासून काँग्रेसच्या काळात हा प्रकल्प संथ गतीने राहिला. या भागात दुय्यम निबंधक कार्यालय, पुणे शहर तहसीलदार कार्यालय, उमाजी नाईक स्मारक, खडक पोलिस स्टेशन अशी अत्यंत महत्त्वाची कार्यालये आहेत. परंतु त्या ठिकाणी नागरिकांना बसण्याकरता कोणतीही व्यवस्था नाही नसून खुर्च्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सर्व्हरबद्दल कायम तक्रारी असतात, तसेच कार्यालयाकडे जाणारा रस्ता सुद्धा अरुंद असून अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर येथील कामाला गती द्यावी, अशी मागणी यावेळी रासने यांनी केली.

Web Title: MLA Hemant Rasne demands that the redevelopment of the police colony and the magistrate's court should be accelerated.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.