आमदार कुल यांनी केली यवत कोविड सेंटरची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:36+5:302021-05-05T04:18:36+5:30
आमदार कुल यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. बाधित रुग्णांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा या ...
आमदार कुल यांनी कोविड सेंटरमध्ये जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. बाधित रुग्णांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा या वेळी वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर यांनी दिला. ग्रामीण रुग्णालयात सध्या २७ नवीन ऑक्सिजन बेड वाढवून एकूण ८१ ऑक्सिजन बेड्स उपलब्ध झाले आहेत.
आमदार कुल यांनी विलगीकरणासाठी ३५ बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार नवीन ३५ बेड उपलब्ध झाले आहेत. रुग्णांना उपचारासाठी अधिकाधिक बेड्स व आवश्यक औषधे उपलब्ध व्हावेत यासाठी देखील प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर लसीकरण मोहिमेसाठी लसींचे मागणीप्रमाणे नियोजन करावे, कोविड टेस्टची संख्या वाढवावी व ऑक्सिजन सिलिंडरचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना या वेळी आमदार राहुल कुल यांनी दिल्या.
यवत ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर यांच्याकडून माहिती घेताना आमदार राहुल कुल.